पोलिसांनी पत्नीस घटस्फोट न देता केले दुसरे लग्न

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता एका तरुणीसोबत परस्पर विवाह करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chain snatching in kalyan

विवाहित व्यक्तींनी दुसऱ्यांदा लग्न करताना आधीच्या पत्नीस कायद्यानुसार घटस्फोट देणे गरजेचे असते. कायद्यानुसार आधीच्या पत्नीस घटस्फोट न देता ती व्यक्ती लग्न करु शकत नाही, असा कायदा असून देखील एका हवालदार पोलिसांनी हा कायदा मोडल्याचे चित्र समोर आले आहे. एका पोलीस हवालदारांनी आपल्या पत्नीस घटस्फोट न देता दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस हवालदारासह लग्न लावून देणाऱ्या सासरच्या लोकांविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

औरंगाबाद येथे ग्रामीण पोलीस दलातील हवालदार दीपक भाले यांनी पहिली पत्नी असताना देखील दुसरा विवाह केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तक्रारदार महिला आणि आरोपी ग्रामीण पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद होत होते. त्या वादातून दीपकच्या घरच्यांनी तिला धमकी देखील दिली होती. तू त्याच्याशी सतत भांडत राहिलीस तर त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देण्याची भाषा वापरली. दरम्यान, त्यांच्या पाठिंब्यावर दीपकने देखील एका १९ वर्षीय तरुणीसोबत विवाह केला. ही बाब समजताच भाले यांच्या पहिल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पती आणि सासरच्या मंडळींची पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.


हेही वाचा – ST महामंडळाला १ हजार कोटी देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय