घरताज्या घडामोडीमी ईडीच्या नोटिसीची वाट पाहतोय

मी ईडीच्या नोटिसीची वाट पाहतोय

Subscribe

हडप्पा, मोहेंजोदडोसारखी जुनी थडगी उकरण्याचे काम सुरू आहे. २० वर्षांपूर्वींची जुनी प्रकरणे बाहेर काढणे सध्या सुरू आहे. मला अनेकांनी ईडीची नोटीस आली का विचारले. मी वाट पाहतोय आणि आली नोटीस तरी आश्चर्य वाटणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० सत्ताधारी नेत्यांची यादी ईडीकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. या सगळ्या चौकशा पूर्ण होऊ द्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मला अनेकांनी नोटिस आली का विचारले. मी वाट पाहतोय, मलाही नोटीस येईल.

- Advertisement -

मला अनेकांनी नोटिस आली का विचारले. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला नोटिस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्षे जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु असल्याचे मला कळले आहे. आम्हीदेखील तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहे त्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला नोटिस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे, महाराष्ट्रात व्यापार करणे हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करू नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -