Cruise drug bust : सायन्सची पुस्तके, नॅशनल हिंदू हॉटेलमधलं जेवण, NCB कोठडीत आर्यन असा घालवतोय वेळ

एनसीबीच्या ताब्यातील मुलांच्या पालकांनी आणले बर्गर

Mumbai Cruise Drugs Case Fort court gave 1 day aryan khan NCB custody
Cruise drug bust : सायन्सची पुस्तके, नॅशनल हिंदू हॉटेलमधलं जेवण, NCB कोठडीत आर्यन असा घालवतोय वेळ

मुंबईहून गोव्याला जाणार्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यनसह आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे. आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली असून कोठडीत अर्यनला वेळ घालवण्यासाठी सायन्सची पुस्तके देण्यात आली आहेत. तर घरगुती जेवण देण्याची परवानगी नसल्यामुळे एनसीबी कार्यालयाजवळ असलेल्या नॅशनल हिंदू हॉटेलमधून जेवण देण्यात येत आहे. एनसीबीने आर्यनचा मोबाईल तपासासाठी जप्त केला असून सखोल तपास करण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे.

आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या सर्वांचेच मोबाईल एनसीबीने जप्त केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, मोबाईलमधून ड्रग्ज संदर्भात अधिक माहिती मिळेल. मंगळवारी एनसीबीने या प्रकरणात ४ लोकांना अटक केली आहे. तर बुधवारी मुंबईतील पवईमधून एका ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले ४ व्यक्ती हे दिल्लीतील कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या नमास क्रे या कंपनीचे कर्मचारी आहेत. या कंपनीने क्रूझ पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचासह ९ लोकांना अटक करण्यात आले आहे.

शाहरुख खानला चाहत्यांचे समर्थन

आर्यन खानच्या अटक प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानला चाहत्यांकडून आणि बॉलिवूडमधून पाठिंबा मिळत आहेत. या कठीण प्रसंगी शांततेत निर्णय घेण्याचे आवाहन चाहत्यांनी केलं आहे.

एनसीबीच्या ताब्यातील मुलांच्या पालकांनी आणले बर्गर

एनसीबीने क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि त्याच्यासह ९ लोकांना अटक केलं आहे. यानंतर काही लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या ताब्यात असलेल्या मुलांना भेटण्यासाठी पालकांनी एनसीबीच्या कार्यालयाजवळ धाव घेतली होती. यावेळी मुलांना खाण्यासाठी पालकांनी बर्गर घेतलं असल्याचे दिसलं आहे. एनसीबीच्या कार्यालयासमोर अलिशान गाड्या घेऊन पालक उभे होते.

आर्यन खानला घरचे कपडे दिले

आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घरातून कपडे देण्यात आले आहे. एनसीबी कार्यालयात घरचे जेवण देण्याची परवानगी नसल्यामुळे जेवण देण्यात आले नाही. जेवण देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते जी आर्यन खानच्या वकिलांनी अद्याप घेतली नाही. आर्यन खानला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबीने लॅंडलाईनवरुन केवळ २ मिनिटे शाहरुख खान आणि आर्यन खानला बोलण्यासाठी वेळ दिली होती. यावेळी आर्यन खान रडला असल्याचे वृत्त समोर आले आहे.


हेही वाचा : Parambir Singh : परमबीर सिंह बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळाले