घरCORONA UPDATECSIR Seroserve: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार अचानक का वाढतोय? जाणून घ्या

CSIR Seroserve: दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार अचानक का वाढतोय? जाणून घ्या

Subscribe

गेल्या पाच ते सहा महिन्यात लोकांच्या शरीरातील अँटिबॉडीजमध्ये मोठ्या प्रमाणात घट

देशात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अचानक काही दिवसातच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर अचानक देशातील कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढण्यामागचे  कारण शोधण्यासाठी CSIR (Council for scientific and Industrial Research) ने अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या पाच ते सहा महिन्यात लोकांच्या शरीरातील अँटिबॉडीजमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अचानक कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. तसेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळेही कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे.

या अभ्यासात CSIRने एक सेरो सर्वे केला. यात त्यांनी वीस लॅबोरेटरीची मदत घेऊन १० हजारांहून अधिक लोकांवर सेरो सर्वे केला. यात कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावर अभ्यास करण्यात आला. या लोकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रेट १०.१४ टक्के इतका होता.

- Advertisement -

या सर्वेत करण्यात आलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे पीक आले होते. रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर कोरोनाची लाट हळू हळू ओसरली. या काळात लोकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँन्टिबॉडीज तयार झाल्या होत्या त्यामुळेच ते कोरोनाला हरवू शकले. मात्र त्यांच्या शरीरातील अँन्टिबॉडीज इतक्या प्रभावी नव्हत्या की ज्या भविष्यातही पुन्हा काम करतील. त्यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अँन्टिबॉडीज विषाणूंचा होणारा संसर्ग थांबवू शकत नाहीय.

त्याचप्रमाणे या अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, कोरोनाची पहिली लाट ओरल्यानंतर गेल्या पाच ते सहा महिन्यात लोकांमध्ये न्यूट्रीलायझेशन अँक्टिविटी कमी झाली. शरीरात न्यूट्रिलायझेशनची कमतरता निर्माण झाल्याने कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: अजित डोभाल यांचा एक फोन, अन् लस उत्पादनाचा कच्चा माल देण्यास अमेरिका तयार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -