घरताज्या घडामोडीDahanu Panvel Memu :डहाणू - पनवेल मेमू सेवा ११ ऑक्टोबरपासून सुरू

Dahanu Panvel Memu :डहाणू – पनवेल मेमू सेवा ११ ऑक्टोबरपासून सुरू

Subscribe

प्रवाशांमध्ये दिलासा....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक सेवा ठप्प होत्या. त्यामुळे २२ मार्च २०२० पासून लांब पल्ल्याच्या काही मेमू गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. बोईसर-दिवा मेमू सुरु केली असून,डहाणू-पनवेल मेमू सोमवारी ११ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार आहे. हा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला असून,प्रवासीवर्गाला दिलासा मिळणार आहे.विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणाऱ्या मेमू सेवा ७ व ८ एप्रिलपासून सुरू करण्यात आल्या.मात्र पनवेल-डहाणू रोड तसेच बोईसर-दिवा यादरम्यान धावणाऱ्या मेमू गाडीच्या फेऱ्या प्रवाशांसाठी बंद होत्या. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला. पनवेलहून डहाणू मार्गी कामानिमित्त जाणारा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ही मेमू सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.

गाड्यांचे वेळापत्रक 

ही डहाणू-पनवेल मेमू सेवा सोमवारी ११ ऑक्टोबरपासून डहाणू येथून ५:२५ वाजता सुटेल आणि ८:५५ वाजता पनवेल येथे पोहचेल.परतीच्या प्रवासासाठी पनवेलहून सायंकाळी ७:०५ वाजता सुटून रात्री १०:30 वाजता ही मेमू डहाणू येथे पोहचेल. एक्स्प्रेस गाड्यांना सफाळे,पालघर बोईसर,वाणगाव,येथे थांबा असावा. याशिवाय मेमूप्रमाणे शटल पॅसेंजर सेवा सुरु कराव्यात,अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली.

- Advertisement -

पनवेल- डहाणू ही मेमू सेवा पुन्हा एकदा सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या मागणी योग्य प्रतिसाद अद्याप दिला नव्हता. त्यामुळे विरारपलीकडच्या पश्चिम उपनगमध्ये राहणाऱ्या आणि कामनिमित्त मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

- Advertisement -

हे ही वाचा – महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचा गडचिरोली दौरा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -