घरताज्या घडामोडीIIT Bombay : FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केला; दर्शन सोळंकीच्या वडिलांचा...

IIT Bombay : FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केला; दर्शन सोळंकीच्या वडिलांचा आरोप

Subscribe

मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांनीच आता पोलिसांनीवर आरोप केल्याचे समजते. FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शन सोळंखीच्या वडिलांनी केला आहे.

मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांनीच आता पोलिसांनीवर आरोप केल्याचे समजते. FIR दाखल करताना पोलिसांनी छळ केल्याचा आरोप दर्शन सोळंखीच्या वडिलांनी केला आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. (darshan Solanki suicide case iit Bombay father alleges police harassment while filing fir)

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीकडून एफआयआर दाखल करताना दबाव आणि छळ केला जात असल्याचा आरोप दर्शन सोळंकीच्या वडिलांनी केला. मुंबई आयआयटीमध्ये शिकत असलेल्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांने 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.

- Advertisement -

दर्शनच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी संघटनांकडून आणि दर्शन सोळंकीच्या वडिलांकडून आत्महत्येसाठी जातीभेदाचे कारण असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात सखोल चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर 3 मार्च रोजी एसआयटीला दर्शन सोळंकीने आत्महत्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली.

या सुसाईड नोटनंतर जातीभेदाचे मुख्य कारण असल्याचे समोर आले. जबाबानंतर पोलिसांनी या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे दर्शन सोळंकीच्या वडिलांनी पत्रात नमूद केले. पोलिसांनी तयार केलेल्या जवाबानुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून दर्शनच्या कुटुंबियांना सांगण्यात आले आणि त्यामध्ये जातीभेदाचे कारण काढून टाकण्यात आल्याचे दर्शनच्या वडिलांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला असून, या प्रकरणांमध्ये एसआयटीमध्ये नेमलेले पोलीस अधिकारी दर्शन सोळंकीच्या कुटुंबीयाचा छळ करत असून एक प्रकारे दबाव टाकत आहेत’, असा आरोप करत दर्शनच्या वडिलांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास योग्य व्हावा व नेमलेल्या एसआयटीमधील अधिकाऱ्यांवर योग्य ती ॲक्शन घ्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.


हेही वाचा – बंदुकीच्या निशाण्यावर असल्याने राणेंचा भाजपप्रवेश, अरविंद केजरीवालांची खोचक टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -