खालापुरमध्ये शाळेच्या आवारात रंगली दारूची पार्टी

रविवार सुट्टी असल्याचा फायदा काही टारगट तरुणांनी घेतला

Daruchi party on the school premises in Khalapur
खालापुरामध्ये शाळेच्या आवारात चक्क दारूची पार्टी

मद्यपींनी दारू ढोसण्यासाठी सोयीची जागा शोधत खालापूरमध्ये चक्क शाळेच्या आवारात पार्टी केल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गात सध्या शाळा बंद आहेत. शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय बंद असले तरी शिक्षकांची सोमवार ते शनिवार अशी रोजची हजेरी असते. रविवार सुट्टी असल्याचा फायदा काही टारगट तरुणांनी घेत शाळेच्या ओसरीवर दारूची पार्टी केली. शाळेच्या पायरीवर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या टाकण्यात आल्या होत्या. सोमवारी शिक्षक नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या अगोदर देखील पंचायत समिती आवारात, अंगणवाडी परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी धुडगूस घालत. त्यानंतर झालेल्या तक्रारीनंतर काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र पुन्हा मद्यपींनी मोर्चा ज्ञान मंदिराकडे वळविल्याने संताप व्यक्त आहे. शाळा परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – सहा वर्षांनी थप्पड ऐकायला आली का? आदित्यनाथांबद्दलच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल