घरCORONA UPDATECoronavirus: कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

Coronavirus: कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

Subscribe

राज्यातील पोलिस दल कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी हे कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यास एक कोटींची मदत देऊ असे जाहीर केले होते. त्यानंतर इतर राज्य काय मदत जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्याप्रमाणे आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या घोषणेमुळे पोलीस दलाला दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -