Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्याने निर्णय घेताना अडथळे - देवेंद्र फडणवीस

पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्याने निर्णय घेताना अडथळे – देवेंद्र फडणवीस

Subscribe

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाचे उद्धाटन करण्यात आले. या उद्घानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. त्यावेळी 'पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्यामुळे निर्णय घेताना अडथळे निर्माण होतात', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाचे उद्धाटन करण्यात आले. या उद्घानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. त्यावेळी ‘पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्यामुळे निर्णय घेताना अडथळे निर्माण होतात’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्यामुळे निर्णय घेताना अडथळे निर्माण होतात. कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, तर कोणी स्वितर्झलँडचा रिपोर्ड आणतं, कोणी जर्मनीचं आणतं. पण या तिन ठिकाणांपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? कारण प्रमाण भाषा पुण्याची मग प्रमाण रिपोर्ट कोणता? याचा निर्णय करताना वेळ निघून जातो’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांमुळे ज्ञानात भर

“अजित पवार यांनी नुकताच सांगितलं की चौकाचे नाव चांदणी चौक कसं पडलं. कारण मला प्रश्न पडला होता, की दिल्लीमध्ये एक चांदणी चौक असून त्याचा पावणे चारशे वर्षांचा इतिहास आहे. पण पुण्यात चांदणी चौक कसा आला? मला असं वाटलं की या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्य लागतात, त्यामुळे चांदणी चौक नाव पडलं असेल. पण अजितदादा तुम्ही आज ज्ञानात भर घातली आणि चांदणी चौक नाव कसं आलं याबाबत माहिती दिली. शिवाय पुण्यात नावं कशी पडतात. याबाबत सांगितलं तेही खुप महत्वाचं आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

“पहिली मेट्रो मंजूर ही पुण्याची झाली. त्यानंतर नागपूरची झाली. पण नागपूरची पूर्ण झाली. त्यानंतर अतिशय गतीने पुण्याच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले. पुणे मेट्रोमध्ये मोठ्याप्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत. वनकार्डमुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपं जात आहे. त्यामुळे हे वनकार्ड पीएमपीएललाही लागू होईल. त्यामुळे मेट्रोसह पुण्यातील बसमधूनही प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या वनकार्डच्या माध्यमातून आगामीकाळात देशभरातील कोणत्याही ट्रान्सपोर्टमधून प्रवास करता येईल”, असेही फडणवीस म्हणाले.

बस, मेट्रो, ट्रेनसाठी ‘वन कार्ड योजना’ सुरु करा; फडणवीसांच्या सूचना

पुण्यात आता मेट्रो सेवा सुरु झाली आहे. पीएमपीची बस सेवा आधी पासूनच सुरु आहे. लोकल ट्रेन्सही पुणे ते लोणावळा मार्गावर धावतात. पुण्याशी जोडणाऱ्या या सर्व ट्रान्सपोर्ट सिस्टिम्सना वन कार्ड योजनेनं जोडण्यासाठी काम करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोचे एमडी श्रावण हार्डिकर यांना केल्या आहेत. त्यामुळं पुणेकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

एलिव्हेटेड रस्ते उभारण्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पुणे शहरात विमानतळही 10 वर्षे आधी झाला असता तर पुण्याच्या GDP मध्ये 2 टक्क्यांनी भर पडली असती. पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. यामुळे या ठिकाणी रिंग रोड आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याची गरज होती. आता पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -