Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! विडी न दिल्यामुळे ३ लोकांनी बेदम मारहाण करुन कामगाराची केली हत्या!

धक्कादायक! विडी न दिल्यामुळे ३ लोकांनी बेदम मारहाण करुन कामगाराची केली हत्या!

Related Story

- Advertisement -

४९ वर्षीय एका मजदूराची तीन जणांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. विडी न दिल्यामुळे कामगाराची हत्या केल्याचे पोलीस तपासात समजले आहे. ही घटना दक्षिण पूर्ण दिल्लीतील शाहीन बाग क्षेत्रात घडली आहे. शनिवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीचे नाव सिद्दिकी असून पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. तर २० वर्षीय मोहम्मद फैजान, २२ वर्षीय मोहम्मद उस्मान आणि २० वर्षीय जगीर मंसूर या तीन आरोपींना पोलिसांनी दाखल केली आहे. माहितीनुसार, मृत व्यक्ती शाहीन बाग क्षेत्रातील नदीम नावाच्या व्यक्तीच्या घरी कामगार होता. ते दोघे चांगले मित्र झाले होते, एकत्र फिरत होते.

नक्की काय घडले?

- Advertisement -

गुरुवारी संध्याकाळी नदीम आणि सिद्दिकी एकत्र यमुना नदी किनारी धुम्रापान करत होते. त्यावेळेस तीन जण तिथे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे विडी मागितली. जेव्हा विडी देण्यास त्यांनी नकार दिला तेव्हा या तीन लोकांनी त्या दोघांना मारहाण करण्यात सुरुवात केली.

पोलिसांनी सांगितले की, यावेळी नदीम आणि सिद्दिकी स्वतः जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढत होते पण त्या आरोपींना त्यांच्या पाठलाग करत करत मारहाण केली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी मारहाण करतच राहिले. जेव्हा सिद्दिकी या मारहाणी दरम्यान बेशुद्ध झाला तेव्हा आरोपी तिथून पळून गेले. त्यानंतर नदीम आपल्या रुममध्ये सिद्दिकीला घेऊन गेला आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण सिद्दिकीची प्रकृती खालावली होती. म्हणून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – भंगारच्या वादातून अपहरण करून अडीच लाख उकळले


 

- Advertisement -