Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Ganeshostav 2021 : गणेशोत्सवासाठी कर्जतमध्ये बांबूच्या मखरांना मोठी मागणी

Ganeshostav 2021 : गणेशोत्सवासाठी कर्जतमध्ये बांबूच्या मखरांना मोठी मागणी

ईको फ्रेंडली म्हणून गणेशभक्तांचा आग्रह

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेशभक्तांची मखर खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. थर्माकोलच्या मखराऐवजी आता ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरण पूरक मखरांसाठी या भक्तांचा आग्रह असून, येथील रवींद्र कांबरी यांनी तयार केलेल्या बांबूच्या आकर्षक मखरांची मागणी वाढली आहे. कांबरी हे यापूर्वी थर्माकोलचे मखर तयार करायचे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून थर्माकोलच्या मखरांवर बंदी आल्यानंतर ईको फ्रेंडली बांबूपासून मखर बनविणे सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. अष्टविनायक, षटकोनी मंदिर, सिंहासन, धनुष्य सिंहासन, आयक्रॉस मंदिर, काडी मंदिर, चौरस सिंहासन, टॉवर सिंहासन आदी विविध आकारातील मखर बांबूपासून बनविण्यात आले आहेत.

एखाद्या मंदिराप्रमाणे मखर बनवायचे असेल तर एक संपूर्ण दिवस लागतो. मात्र मागणीनुसार कौशल्य वापरून बनवायचे असेल तर कमीतकमी ३ दिवस लागतात. बांबूचे मखर कमीत कमी ४ ते ५ वर्षे उत्तम टिकते. मखर बनविण्याचे काम गणेशोत्सवाच्या ३ महिने आगोदरपासून सुरू होते. त्यानंतर तयार केलेली मखरे विक्रीसाठी बाजारात नेली जातात. त्याकरिता एक महिना बाजारपेठेत गाळा भाड्याने घ्यावा लागतो. आतापर्यंत विविध आकारातील ७० मखरे विकले गेले आहेत. ४ बाय ६ फूट ते २१ बाय ३० इतक्या मोठ्या आकाराचे मखर बनविण्यात येते. त्यांची किंमत २ हजार ५०० ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे.

असे तयार होते मखर

- Advertisement -

बांबू एक वर्ष अगोदर तोडून बांधून ठेवावा लागतो. चांगल्या प्रकारे सुकून द्यावा लागतो. मग त्याला आकाराप्रमाणे सोलण्यात येते. वेगवेगळ्या आकाराप्रमाणे त्याच्या पट्ट्या पाडल्या जातात आणि मग त्या गुंफून मखर तयार केले जाते.

                                                                                                        -ज्योती जाधव


- Advertisement -

हे ही वाचा – ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण


 

- Advertisement -