घरताज्या घडामोडीसाखरचौथ गणेशोत्सवासाठी यावर्षी ज्वेलरीच्या मूर्तींना मागणी

साखरचौथ गणेशोत्सवासाठी यावर्षी ज्वेलरीच्या मूर्तींना मागणी

Subscribe

पेण तालुक्यात साखरचतुर्थी गणेशोत्सवाचे फॅड नव्याने निर्माण झाले आहे.

पाच आणि दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते साखरचौथ गणेशाचे. रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाच्या उत्सवाचा गेल्या दशकभरात या क्रेझ वाढत आहे.गणेशोत्सवासाठी मूर्ती बनविण्याकरता वर्षभर व्यस्त असणार्‍या गणेश मूर्तिकारांची आता साखर चतुर्थीच्या मूर्तींसाठी लगबग सुरू आहे. गणपतीचे गाव असलेल्या पेणमधील मूर्तीकार मूर्तीला अखेरचा हात देत आहेत. चतुर्थीच्या उत्सवासाठी ज्वेलरीच्या मूर्तींना बरीच मागणी असल्याचे सांगितले जाते.येत्या शुक्रवारी २४ सप्टेंबर २०२१ संकष्ट चतुर्थीला या गणपतीचे आगमन होणार आहे.

पेण तालुक्यात साखरचतुर्थी गणेशोत्सवाचे फॅड नव्याने निर्माण झाले आहे. घरगुती उत्सवाने आता सार्वजनिक रूप घेतले आहे. वर्षगणिक या गणपतींची संख्या वाढू लागली आहे. साखरचौथ गणेशोत्सवासाठी आगळ्यावेगळ्या गणेशमूर्ती मिळाव्यात असा आग्रह मूर्तिकारांकडे करीत असतात. हे मूर्तिकार देखील त्यांच्या मागणीला साजेसी मूर्तीची घडण करत असतात. या मूर्तीं साकारण्याचे काम पेणमध्ये जोरकसपणे सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एक ते दीड फुटापासून दहा ते बारा फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती बसवण्याचा ट्रेण्ड होता. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तींच्या उंचींवरील बंधने अधिक कडक झाल्याने कमी उंचीच्या मूर्तीं घडवल्या जात आहेत.पेणच्या मूर्तिकलेला अधिक वाव मिळून देणारा हा गणेशोत्सव नावीन्यपूर्ण कलाविष्काराचा अजब नमुना ठरत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधने आली आहेत. यामुळे मोठ्या मूर्ती बनवण्याचे आम्ही टाळले आहे. मात्र मर्यादित उंचीच्या मूर्तींना फेटे, धोतर आणि ज्वेलरीची मागणी वाढली आहे.
नितिन पाटील – मूर्तीकार पेण


हे ही वाचा – तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर विषारी नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -