घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी खरेदी, पूजासाहित्यासह सुपांची मागणी वाढली

गणेशोत्सवासाठी खरेदी, पूजासाहित्यासह सुपांची मागणी वाढली

Subscribe

सुपांची मागणी वाढल्याने विक्रेते मोठ्या प्रमाणात बाजाराप्रमाणे दारोदारी फिरतानाही नजरेला पडत आहेत.

गणेशोत्सव सुरू होण्यास अवघे दोन दिवस उरलेले असताना या दरम्यान गौरीच्या ओवश्यासाठी घरातील कर्ते पुरुष बाजारपेठेत सुपे खरेदी करण्यासाठी येत आहेत. सुपांची मागणी वाढल्याने विक्रेते मोठ्या प्रमाणात बाजाराप्रमाणे दारोदारी फिरतानाही नजरेला पडत आहेत. गणपतीच्या सणानिमित्त नुकतेच लग्न होऊन सासरी आलेल्या सुवासिनीनीकडून गौरीचे पाच सुपे फळे, फुलांनी भरून पूजन करण्यात येत असते. परंपरेने आलेल्या रुढीरितीनुसार त्याला ओवसा म्हणतात. यावेळी ही विवाहिता आपले सौभाग्य अखंड राहाण्यासाठी आणि संसार सुखी होण्यासाठी गौरीकडे प्रार्थना करते. त्यामुळे ओवसा पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच सणाच्या चार दिवस आधी भाऊ आपल्या बहिणीला सूप घेऊन माहेरी आणण्यासाठी तिच्या सासरी जात असतो, असा प्रघात असल्याने गौरी गणपतीच्या सणाला सुपांची मोठी मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठेत ठिकठिकाणी दुकानांतून सुपे विक्रीस ठेवल्याचे पहायला मिळते.

येथून १ किलोमीटर अंतरावर चोळई कोंड गावात घरोघरी सुपे बनविली जात आहेत. जून महिन्यापासून गणपती सणापर्यंत तेथील घरांमध्ये सुपे बनविण्यात येतात. या व्यवसायात फार नफा मिळत नसला तरी त्याकडे जोडधंदा म्हणून पाहिले जाते. सूप तयार करण्यासाठी बांबूच्या काठीचा वापर केला जातो. त्यासाठी मेस किंवा ढोफा या जातीचे बांबू वापरतात. याबाबत चोळई कोंड येथील व्यावसायिक सुरेश शंकर गायकवाड यांनी सांगीतले की, बांबूचे दोर सोलण्याचे (पातळ तुकडे करणे) काम पुरुष करतात, तर सूप महिला वळतात.

- Advertisement -

सूप १६ बंदी बनविले जाते. 10 फुटांच्या बांबूमध्ये २ सुपे तयार होतात. सुपासाठी गावोगावी बांबूच्या काठ्यांसाठी फिरावे लागते. एका बांबूसाठी ४० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सुपाची किंमत १४० रुपये आहे. तसेच दुकानदारांच्या मागणीप्रमाणे सुपे दिली जातात.


हे ही वाचा – MPSC Exam 2020 : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, आता प्रतीक्षा मुख्य परीक्षेची

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -