घरताज्या घडामोडीसुरळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शेतात प्रात्यक्षिक

सुरळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शेतात प्रात्यक्षिक

Subscribe

शेतकर्‍यांना सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवून अळीचा प्रादुर्भाव वेळीच नष्ट करता येत असल्याचा उपाय सांगितला.

म्हसळे तालुक्यातील २९०० हेक्टर शेती लागवड क्षेत्रापैकी २४०० हेक्टर क्षेत्रात बहुतांश शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणावर भातशेतीचे उत्पादन घेतले असून, ४०० हेक्टरवर नागली, तर १०० हेक्टरवर वरीचे पीक घेतले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरीही पिकावर सुरळी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सुरळी अळी वेळीच नष्ट करण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी कृषी कन्या नम्रता चौधरी हिने शेतकर्‍यांना सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवून अळीचा प्रादुर्भाव वेळीच नष्ट करता येत असल्याचा उपाय सांगितला. खरसई येथील शेतकरी तुकाराम शीतकर यांच्या शेतावर नम्रता हिने उपस्थित महिला शेतकर्‍यांना भात पिकांवर सुरळी अळीची माहिती सांगताना ही अळी पतंग अत्यंत लहान, नाजूक, दुधाळ आणि पांढरा असून, त्याच्या पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान लहान ठिपके असतात. तसेच दुसरी अळी पारदर्शक फिकट हिरवट, पांढरट रंगाची असते.

- Advertisement -

ही अळी भाताचे कोवळे पान तोडून त्याचे लहान तुकडे करते आणि त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी भाताच्या आव्यावर चढते आणि पानातील हरितद्रव्य खरडवून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. स्वाभाविक शेत निस्तेज दिसते. पिकाची वाढही खुंटते. भातावरील सुरळ्या पानाच्या एका कडेला लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या निदर्शनास येतात. अशा वेळी अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी अडवून उभ्या पिकावरुन एक दोरखंड आडवा धरुन ओढत न्यावा, त्यामुळे पिकावरील कीड पाण्यात पडते. अळ्या खाली पडल्यानंतर एक दोन तासांनी शेतातील पाणी एका बाजूला सोडावे. जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील त्यानंतर त्या नष्ट कराव्यात, असा सोपा उपाय सांगितला आहे.

गरज भासल्यास प्रति हेक्टरी फेनथोएट ५० टक्के प्रवाही १००० मिलिलीटर, ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी, अशी माहिती दिली. प्रात्यक्षिकाच्या वेळी सुशिला शितकर, चांगुणा शितकर, विद्या शितकर, रुचिता शितकर, महाली मांदारे, पदिबाई कांबळे, लता कांबळे उपस्थित होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – आता शेतीसंबंधीत सामान मिळणार भाड्याने; Farmkart Start-Up ची नवी स्कीम घ्या जाणून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -