Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live update: दिल्ली कोरोनाचा कहर! मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बोलावली तातडीची बैठक

Live update: दिल्ली कोरोनाचा कहर! मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बोलावली तातडीची बैठक

Related Story

- Advertisement -

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावली तातडीची बैठक


- Advertisement -

बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकर यांना पाचव्यांदा संधी देण्यात आली आहे.


- Advertisement -

मध्य प्रदेशमधील जबलपूरचे खासदार राकेश सिंग यांनी कोरोना लस घेतली.


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.


एनआयएचे पथक मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी दाखल झाले आहे. येथील सोनी इमारतीत असणाऱ्या कल्चर हाऊस या हॉटेलमध्ये एनआयएची तपासणी सुरू असून हॉटेल मधील कर्मचारी यांना हॉटेल बाहेर काढण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वी एनआयएचे पथक वाझे याला घेऊन या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्याला १५ ते २० पाऊले चालण्यास सांगितली होते. या हॉटेलचा आणि या प्रकरणाचा काय संबंध आहे याचा लवकरच उलगडा होईल अशी शक्यता आहे. दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणात लवकरच एका माजी पोलीस अधिकाऱ्यासह गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याला अटक होण्याची दात शक्यता आहे, ३ मार्च रोजी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्या सोबत हे दोन अधिकारी अंधेरी चकाला या ठिकाणी एकत्र आले असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले असून त्या परिसरात सीसीटीव्ही मिळवण्याचा एनआयए प्रयत्न करीत आहे.


आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी पत्नीसह कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.


मुंबईत लॉकडाऊन लावू नको, या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरले आहेत.


भाजप नेते अन्वर खान यांच्या घरावर दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे.


केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची कोरोना लसीचा पहिला डोस दिल्लीत एम्स रुग्णालयात घेतला.


खासदार सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढ कमी करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. सप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती.’

अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य…

Posted by Supriya Sule on Wednesday, March 31, 2021

 


ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा


देशात २४ तासात ७२ हजार ३३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा


नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय निश्चीत – संजय राऊत

लोकशाहीवर आतापर्यंत अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यावेळी जनतेने उत्तर दिले आहे. – राऊत


माजी कॅबिनेट मंत्री महादेव जाणकर यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन


मुंबईत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु, २ टप्प्यात होणार लसीकरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुभेच्छा दिल्या.


बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे

बचत योजनांवर व्याजदर जैसे थे राहणार


भरधाव ट्रकची ८ जणांना धडक, ४ ठार

मद्यधूंद चालकाने रायगडमध्ये ८ जणांना धडक मारली यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले आहेत.


आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

 

- Advertisement -