Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live update : शरद पवारांवर आजच शस्त्रक्रिया होणार

Live update : शरद पवारांवर आजच शस्त्रक्रिया होणार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आजच शस्त्रक्रिया होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी दिली.


बॉलिवूड अभिनेता एजाज खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. एजाज खानला अटक होण्याची शक्यता आहे.


- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचा ताफा आहे. शरद पवार यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. पित्ताशयाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.


येत्या २५ एप्रिलला होणारी इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक नवं परिपत्रक जारी करत या परीक्षा २३ मे होणार असल्याचं घोषित केलं आहे. १० एप्रिल २०२१ पर्यंत आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे परिपत्रक


काँग्रेसमुळेच ठाकरे सरकार टिकून आहे – नाना पटोले


सचिन वाझे छातीत दुखत असल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल


काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली होती. यादरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याची आणि काळजी घेण्याची आवाहन केले आहे. याबाबत सचिन सावंत यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर आढावा घेण्यासाठी ४ वाजता आढावा बैठक बोलावली आहे. महापौर, पालिका आयुक्त राहणार उपस्थित


दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस.रेड्डी निलंबित


कोरोना आल्यापासून भाजप फक्त सरकारला अडचणीत आणत आहे. भाजपला लोकांशी देणघेणं नाही. खासगी रुग्णलयातील ८० टक्के बेड पालिकेच्या ताब्यात


नांदेड हल्ला मोहल्ला मिरवणूक प्रकरण अतिशय निंदनीय आहे. या घटनेची पोलीस सखोल चौकशी करत आहे. दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेड हल्ला प्रकरणामुळे तात्काळ बैठक बोलावली होती.


भाजप उमेदवार समाधान औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते पंढरपुरमध्ये उपस्थित


परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर हायकोर्टात बुधवारी होणार सुनावणी. परमबीर सिंह यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात मुकूल रोहतगी करणार युक्तिवाद. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली याचिका


केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य मंत्री हर्षवर्धन


मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतली कोरोना लस घेतली आहे. बीकेसीतील लसीकरण केंद्रावर जाऊन आयुक्तांनी कोरोनाची लस घेतली आहे.


लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा – नवाब मलिक


राज्यात लॉकडाऊन करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे.


लॉकडाऊन लावण्यास संजय निरुपम यांचा विरोध


शरद पवारांना सांगितले आहे पंढरपूर पोटनिवडणूकीची काळजी करु नका, या पोटनिवडणूकीत भगीरथ भालकेच विजयी होतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील ३ पक्षांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनला विरोध करणे बेजबाबदारीचे आहे.

राष्ट्रवादीकडून लॉकडाऊन करण्यास विरोध नाही – जयंत पाटील


नागपूर शासकीय रुग्णलायात कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या वृद्धाची आत्महत्या, रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ऑक्सिजन पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


आम्ही खूप ताकदीने पंढरपूर लढवली आहे. पंढरपूरची निवडणूक आम्हीच लढणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनला सर्वांचाच विरोध आहे. सरकारबाबत जनतेमध्ये असंतोष असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


मुंबई-गोरेगाव पश्चिमेला दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीचे कारण अद्या अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे चिंतेचे वातावरण, लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

लोकांनी नियम पाळल्यास लॉकडाऊन करावा लागणार नाही – राजेश टोपे


राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.


देशात गेल्या २४ तासात ५६ हजार २२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


नांदेडमध्ये सोमवारी पोलिसांवर तलावारीने केलेल्या हल्ल्यात १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ३५० अज्ञातांविरोध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन, रुग्णालया उपचार घेताना ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.


पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना कोरोनाची लागण झाली आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे.


दीनदयाळ उपाध्याय वसतिगृहाला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडीत दीनदयाळ उपाध्याय वसतिगृहाला आग लागली होती. वसतिगृहातील सगळ्या ७४ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

- Advertisement -