Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संध्याकाली ८.३० वाजता संबोधित करणार  

Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संध्याकाली ८.३० वाजता संबोधित करणार  

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संध्याकाली ८.३० वाजता संबोधित करणार, मुख्यमंत्री काय सांगणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता


पुण्यात मिनी लॉकडाऊन

- Advertisement -

पुण्यात बार रेस्टरॉट हॉटेल पुढील ७ दिवस बंद राहणार पार्सल सर्व्हिस सुरु राहणार, मॉल्स आणि हॉल देखील बंद राहणार, धार्मिक स्थळे, पीएमपीएल बसेस ७ दिवस बंद राहणार असे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत पुढील ७ दिवस संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहेत.


बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढतोय – महापौर

- Advertisement -

रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कठोर करण्याबाबत निर्णय घेऊ – महापौर

लॉकडाऊन कुणालाच नको असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक – महापौर

आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.


मुंबई महापालिकेच्या बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये जाऊन भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांनी घेतली कोरोनाची लस


पुण्यात लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध अधिक कडक करण्यात येणार, लॉकडाऊनला सर्व अधिकाऱ्यांचा विरोध, पुण्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येणार, अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय


नाशिकमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडेंना सक्तीच्या रजेवर पाठविले, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कारवाई


शरद पवारांची प्रकृती उत्तम शिवसेना नेते संजय राऊत यांची शरद पवारांना भेटल्यानंतर प्रतिक्रिया


सचिन तेंडुलकरला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सचिन तेंडुलक रुग्णालयात दाखल झाला आहे. याबाबत त्याने ट्विट करत माहिती दिली आहे.


शिवसेना नेते संजय राऊत ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयातील खडे काढले होते.


मुंबईत निर्बंध लागतील मात्र लोकल बंद होणार नाही अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


केंद्रीय मुख्य सचिवांची मुख्य सचिवांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलावली महत्त्वाची बैठक, संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक, कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने घेणार आढावा बैठक, एनसीबीची रात्री नवी मुंबई आणि जोगेश्वरीत छापेमारी


एनसीबीची धडक कारवाई अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर नवी मुंबई आणि जोगेश्वरीमध्ये छापेमारी करत २ ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज पेडलर्सकडून १.५ करोड रुपये बाजार भाव किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे.


देशात मागील २४ तासात ८१ हजार,४६६ हजार कोरोना रुग्णांची नोंद तर ४६९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

India reports 81,466 new #COVID19 cases, 50,356 discharges, and 469 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.

Total cases: 1,23,03,131
Total recoveries: 1,15,25,039
Active cases: 6,14,696
Death toll: 1,63,396

Total vaccination: 6,87,89,138 pic.twitter.com/QkmQxfpsNB

— ANI (@ANI) April 2, 2021


पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध आज पुन्हा होणार निर्णय, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे जिल्हा कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा. ११ वाजता होणार आढावा बैठक


कोरोनाचे नियम झुगारुन बावधनमध्ये बगाड यात्रेचे आयोजन, हजारो भाविकांची उपस्थिती


गुरुवारी ३६,७१,२४२ जणांनी घेतली कोरोनाची लस, आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.


पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु


अभिनेत्री आलिया भट कोरोना पॉझिटिव्ह


सचिन वाझेची मैत्रीण मीना जॉर्ज एनआयएच्या ताब्यात

अंबानी स्फोटक प्रकरणात अटक झालेल्या सचिन वाझेंची मैत्रीण मीना जॉर्जला एनआयएना गुरुवारी ताब्यात घेतले आहे. एनआयएचे पथक या महिलेची चौकशी करत आहे. वाझेंच्या कटात मीना जॉर्जचाही सहभाग असल्याचा संशय एनआयएच्या पथकाला आहे.

- Advertisement -