Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Updates: राज्यात ५५,४६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Updates: राज्यात ५५,४६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

 

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत असून सोमवारी ४७ हजारांपर्यंत घसरलेल्या रुग्णसंख्येने मंगळवारी पुन्हा उच्चांक गाठला. मंगळवारी राज्यामध्ये ५५ हजार ४६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली असून ४ लाख ७२ हजार २८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.


अमरावती जिल्ह्यातील लॉकडॉऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या आज मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून मागणी करणार आहेत.


- Advertisement -

ठाण्यात आज १,८८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा ८७,२८९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ७२,८९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या १२,९८० रुग्णांवर  उपचार सुरु आहेत. दिवसभरात १,२१३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.


भिवंडी शहरातील शास्त्री नगर येथील प्लास्टिकचे मणी बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. कोणतीही जीवितहानी नाही.


अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी त्वरित स्वत: ला वेगळं केलं आहे आणि मी होम क्वारंटाईन होणार आहे.”


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा.


दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकार सहकार्य करेल

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावे, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.


दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतची बैठक सुरु, शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलावली बैठक


पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलं कारण ही आधी पेक्षा मोठी लाट आहे – राज ठाकरे

निर्बंधांच्या काळात वीज बिल कनेक्शन तोडणी बंद करा- राज ठाकरे

क्रिडा क्षेत्रात सराव करणाऱ्या खेळाडूंना परवानगी द्या – राज ठाकरे

कोरोना काळात घेतलेल्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करा – राज ठाकरे

१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले पाहिजे – राज ठाकरे


भाजप नेते उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेणार भेट


दिलीप वळसे पाटील दुपारी१.३० वाजता घेणार गृहमंत्री पदाचा चार्ज


राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता


येत्या ८ दिवसांत महाविकास आघाडीमध्ये तिसरा राजीनामा होणार – चंद्रकांत पाटील


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या जीवाला धोका, सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयाला आला धमकीचा मेल


दाक्षिणात्य अभिनेता विजयने केले मतदान


शेअर बाजारात सेन्सेक्स ३०१ ने वाढला असून ४९,४६० वर आहे तर निफ्टी १४,७३९


दादर भाजीपाला मार्केटमध्ये पुन्हा ग्राहकांची गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंगन


गेल्या २४ तासात १२ लाख ११ हजार ६१२ जणांची कोरोन चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ करोड २ लाख ३१ हजार २६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


अजित पवार सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला, शरद पवारांसोबत होणार महत्त्वाची बैठक, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटीलही शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.


वीकेंडला लॉकडाऊन परिणामकारक नाही केंद्राचा राज्याला सल्ला, केंद्रीय गृहसचिवांची महाराष्ट्रातील वीकेंड लॉकडाऊनवर टिप्पणी


अभिनेता कमल हसन आणि श्रती हसन यांनी तमिळनाडूमध्ये मतदान केले.


अभिनेता रजनीकांतने केले मतदान, देशात ५ राज्यांमध्ये मतदान सुरु आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता रजनीकांतने मतदान केले आहे.


१०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत आज होणार निर्णय


शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा स्थगित


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार

- Advertisement -