घरताज्या घडामोडीLive Update: पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Live Update: पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

…तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही

राज्यात पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. निर्बंध हळूहळू उठवले जातील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यात कोरोनामुक्त गाव ही मोहीम महत्वाची ठरेल. प्रत्येकाने जर जिद्दीने ठरवले की मी माझे घर, माझे गाव, माझा जिल्हा, माझे राज्य कोरोनामुक्त करणे, तर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

अनाथ बालकांचे पालकत्व सरकार घेणार – मुख्यमंत्री

कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेक बालके अनाथ झाली आहेत. या बालकांचे पालकत्व आता सरकार घेणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधताना म्हणाले.

- Advertisement -

कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे

राज्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे. गावं कोरोनामुक्त झाली, तर राज्य कोरोनामुक्त होईल. हिरवेबाजर, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. देशाने आपल्या राज्याचा आदर्श घेतला पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


फॅमिली डॉक्टरांनी भूमिका महत्वाची

प्रत्येक कुटुंबाचे ‘फॅमिली डॉक्टर’ असतात, ज्यांना त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आरोग्याविषयी माहिती असते. आता या डॉक्टरांनी भूमिका खूप महत्वाची असणार आहे. आता पावसाळा येत असल्याने साथीचे रोग रोखणे आवश्यक आहे. कोविड रुग्ण आणि नॉन-कोविड रुग्ण यांच्यातील फरक ओळखणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


कोरोना अजून नियंत्रणात आलेले नाही – मुख्यमंत्री

महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोना अजून नियंत्रणात आलेला नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. दुसऱ्या लाटेतील विषाणू झपाट्याने पसरतो आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधताना म्हणाले.


तौत्के चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांना लवकरच नुकसान भरपाई देणार 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करत असून त्यांनी सुरुवातीला तौत्के चक्रीवादळाबद्दल भाष्य केले. तौत्के चक्रीवादळ हे बहुधा सर्वात भीषण चक्रीवादळ होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तौत्के चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात रुग्णसंख्येत घट; ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

रविवारी राज्यात १८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ८०१ वर पोहोचली आहे. तसेच ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.


मुंबईमध्ये १ हजार ६६ नवे कोरोनाबाधित

मुंबईमध्ये मागील २४ तासांत १ हजार ६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. तसेच १३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.


३ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता


सिद्धार्थ पिठानीनंतर नीरज आणि केशव यांना NCBकडून समन्स

सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) नीरज आणि केशव यांना समन्स बजावले आहेत. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूशी निगडित ड्रग्ज प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


 

मुख्यमंत्री आज रात्री राज्यातील जनतेशी साधणार संवाद

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८:३० वाजता राज्यातील जनतेशी साधणार संवाद साधणार आहेत. राज्यातील लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.


अज्ञात व्यक्तीकडून मंत्रालय उडवण्याची धमकी

अज्ञात व्यक्तीने कॉल करून मंत्रालय उडवण्याची दिली धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली जात आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने बॉम्ब स्कॉड,श्वान पथक मंत्रालयात दाखल करण्यात आले आहे.


बाळासाहेब थोरात यांची पंतप्रधनांवर टीका

गेल्या सात वर्षात पंतप्रधानांनी मोठ मोठी आश्वासने दिली आणि सत्ता हस्तगत केली. त्यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदींवर केली.


सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताचे काँग्रेसचे नागपूरात विषेध आंदोलन

मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताचे काँग्रेसने नागपूरात विषेध आंदोलन केले. नागपूरच्या काँग्रेस कार्यालय देवडिया काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले.


देशाच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजन पोहचला आहे – पंतप्रधान


देशात १,६५,५५३ नव्या रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासात १ लाख ६५ हजार ५५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ लाख ७६ हजार ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या २१ लाख १४ हजार ५०८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात ३ हजार ४६० रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.


पंतप्रधान मोदी साधणार मन की बातमधून जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.


केरळ किनारपट्टीपासून मान्सून अंदाजे २०० किलोमीटर वर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तौक्ते आणि यास चक्रीवादळामुळे केरळमध्ये जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे मान्सून २-३ दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. ३१ मे किंवा १ जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -