घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी ढोलकीचा नाद; खरेदीत वाढ

गणेशोत्सवासाठी ढोलकीचा नाद; खरेदीत वाढ

Subscribe

ढोलकी हे आरतीचे एक महत्त्वाचे अंग असल्याचे हेरून परप्रांतीय ढोलकी व्यावसायिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी येथे डेरा टाकतात.

ढोलकीच्या तालावर विविध आरत्या म्हणण्यातील मजा काही औरच असते. काही वर्षांपर्यंत आरत्यांच्या वेळी ढोलकीचा नाद कमी प्रमाणात ऐकायला येत असे. मात्र ढोलकी हे आरतीचे एक महत्त्वाचे अंग असल्याचे हेरून परप्रांतीय ढोलकी व्यावसायिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी येथे डेरा टाकतात आणि त्यांच्या ढोलक्यांचा खपही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ही ढोलकी आता आरतीसाठी जवळपास प्रत्येक घरात अविभाज्य भाग होत चालली आहे. शहर हे गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असून, अनेक घरांतून, तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असतो. त्यामुळे बाप्पांची पूजाअर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना ढोलकीचीही गरज अनेकांना वाटू लागते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ढोलकी विक्रेते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दाखल होत असून, गल्लोगल्ली विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आतापासूनच ठिकठिकाणी ढोलकीचा नाद घुमू लागला आहे.

डेरेदाखल झालेले विक्रेते उत्तर प्रदेशातून ढोलकी आणून आपला व्यवसाय करीत आहेत. यांची किंमत आकारमानानुसार 100 पासून 300 ते 500 रुपयांपर्यंत आहे. गणेशोत्सव आता आठवड्यावर येऊन ठेपल्याने ढोलकी विक्रीही वाढू लागली आहे. विशेष म्हणजे हे ढोलकीवाले ठिकठिकाणी गावागावांतून फिरू लागले असून, लहान मुलांना त्यांचे अधिक आकर्षण वाटत असल्याचे लक्षात येते.

- Advertisement -

हे ही वाचा – शिवसेनेच्या खासदाराचा जावई थिअटर्स सुरु करण्यासाठी वाटाघाटी करतोय; शेलारांचा खळबळजनक आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -