घरCORONA UPDATEMumbai Power Cut: हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर सुरु राहणार; चहल यांचा मास्टर प्लॅन

Mumbai Power Cut: हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर सुरु राहणार; चहल यांचा मास्टर प्लॅन

Subscribe

मुंबईच्या सध्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या वेळासाठी संपुर्ण शहराचा वीज पुरवठा खंडीत होत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात वीज खंडित झाल्यामुळे अनेकजण भयभीत झाले होते. कारण कोरोनाचे गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबल सिंह चहल यांनी व्हेंटिलेटर बंद न होऊ देण्यासाठी एक मास्टर प्लॅन आखला आहे. “रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. किमान आठ तास पुरेल इतका इंधन साठी करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेषता आयसीयू सेवेत खंड पडू न देण्याचे आदेश देण्यात आले आहे.”

दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे जेजे हॉस्पिटलमध्ये एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय मशीन बंद, ओपीडी बंद, रुग्णांना परत पाठवले असून रुग्णांची गैरसोय झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -