घरताज्या घडामोडीउरण : पाणजे पाणथळ जैवविविधता उद्यान संवर्धनासाठी डिजीटल आंदोलन सुरू

उरण : पाणजे पाणथळ जैवविविधता उद्यान संवर्धनासाठी डिजीटल आंदोलन सुरू

Subscribe

नॅटकनेक्ट फाउंडेशनने काँक्रीटच्या जंगलात रुपांतरण करण्यासाठी पाणथळ क्षेत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर जोरदार प्रहार केला आहे.

जागतिक स्थलांतरीत पक्षीदिनाच्या निमित्ताने पर्यावरण तज्ञांनी उरणमधल्या ३०० हेक्टरमध्ये पसरलेल्या पाणजे पाणथळ क्षेत्राचे जैवविविधता उद्यानाच्या स्वरुपात संवर्धन करण्यासाठी आणि दीड लाखांहून अधिक पक्षांच्या गंतव्य स्थानाला तसेच मासेमारी करणार्‍या समुदायाच्या चरितार्थाच्या पारंपारिक स्त्रोताला वाचवण्यासाठी डिजीटल आंदोलन सुरु करण्यात आले आहे. डब्ल्यूएमबीडी हे वार्षिक जागरुकता निर्माण अभियान असून, ते स्थानांतर करणार्‍या पक्षांच्या आणि त्यांच्या रहिवासाच्या संवर्धनाच्या गरजेला अधोरेखीत करते. मे आणि ऑक्टोबरचा दुसरा शनिवार आंतरराष्ट्रीय साजरीकरणाचा मुख्य दिवस असतो. या संदर्भात, नॅटकनेक्ट फाउंडेशनने काँक्रीटच्या जंगलात रुपांतरण करण्यासाठी पाणथळ क्षेत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर जोरदार प्रहार केला आहे. या पर्यावरण संस्थेने शासनाला, अधिका-यांना आणि लोकांना उद्देशून पर्यावरणदृष्ठ्या नाजुक असलेल्या उरणच्या शिल्लक राहिलेल्या एकमात्र मोठ्या पाणथळ क्षेत्राला वाचवण्यासाठी सोशल मीडिया वेकअप कॉल केला आहे.

शासनाला उद्देशून केलेली ऑनलाइन याचिका, फेसबूक, ट्विटर व इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट डिजीटल आंदोलनाचा भाग आहेत. अस्तित्वात असलेल्या पाणथळ स्थळांना जर नष्ट केले तर ती नक्कीच हिमालयीन स्तराची पर्यावरणात्मक विपदा असेल, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिणारे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी स्पष्ट केले. जैवविविधता उद्यान म्हणून घोषित केलेले पाणजे पाणथळ क्षेत्र मुंबई व एमएमआरच्या लोकांसाठी आदर्श डब्ल्यूबीएमडी भेट असेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी सूचवले आहे. संबंधित अधिकार्‍यांना तसेच मुख्यत्वे लोकांना जैवविविधतेच्या संवर्धनाच्या महत्वाची जाणीव करुन देणे व संवेदनशीलता निर्माण करणे हा देखील सोशल मीडिया अभियानाचा उद्देश आहे, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईमध्ये आता एक इंच जमीन देखील उपलब्ध नाही आणि दुर्दैवाने पर्यावरणाची देखभाल जणू काही दिवास्वप्न बनले आहे, असे कुमार म्हणाले. आपल्याला कुठेही ३०० हेक्टर एवढे विस्तिर्ण क्षेत्र सापडणार नाही. पण पाणजे येथे ते आहे.
श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी द्रोणागिरी नोडसाठी पूर निवारणाचा एक भाग म्हणून पाणजेचे होल्डिंग पाँड नं १ स्वरुपात चिन्हांकीत केल्याबद्दल सिडकोची प्रशंसा केली होती. तरीदेखील याच सिडकोने नवी मुंबई सेझला पाणजे पाणथळ क्षेत्र देऊन टाकले आहे. यामुळे सिडकोची पर्यावरण समर्थक धोरणे किती पोकळ आहेत, हे उघड झाल्याचे पवार म्हणाले.

                                                                                               वार्ताहर – राजकुमार भगत  

हे ही वाचा – Karuna Sharma Case : करुणा शर्मांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -