घरताज्या घडामोडीDiwali 2020: या वर्षीची दिवाळी आहे खास, ४९९ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग

Diwali 2020: या वर्षीची दिवाळी आहे खास, ४९९ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग

Subscribe

यावर्षीची दिवाळी ही ५ दिवसांऐवजी फक्त चार दिवसांचीच आहे.

दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीचे ५ दिवस दिवाळीची लगबग चालू असते. पण यावर्षीची दिवाळी ही ५ दिवसांऐवजी फक्त चार दिवसांचीच आहे. असं म्हटलं जात आहे की,हा दुर्मिळ योग १५२१ नंतर आता २०२० मध्ये पहिल्यांदा येत आहे. तब्बल ४९९ वर्षांनी हा योग जुळून आला आहे.

या दिवाळीत ग्रहांचा मोठा खेळ पहायला मिळणार आहे. या दिवाळीत गुरू ग्रह स्व:राशीत असणार आहे. तर धनु आणि शनि मकर राशीत असणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र ग्रह कन्या राशीत असणार आहे.

- Advertisement -

दिवाळीचा सण हा पंच महोत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र या वर्षी दिवाळी चार दिवस साजरी करण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबरला धनत्रयोदशी पासून दिवाळीची सुरूवात होणार आहे. नरक चतुर्दशी आणि लक्षीपूजन हे १४ नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक अमावस्येनंतर लक्ष्मी देवी धरतीवर येते. अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरत असते. त्या दिवशी सण साजरा करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या वर्षी अमावस्या १४ नोव्हेंबरला सुरू होऊन १५ नोव्हेंबरला संपणार आहे. यामुळे या वर्षी लक्ष्मी पूजन १४ नोव्हेंबरलाच साजरी करण्यत येणार आहे. तर १६ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे.

या वेळी दिवाळी शनिवारी आली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शनिवारचा मुहूर्त हा चांगला मुहूर्त आहे. या दिवशी शनी ग्रह मकर राशीत आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. तंत्र पूजेसाठी दिवाळी हा विशेष समजला जातो. १४ नोव्हेंबरला शनिवारी दिवाळी आहे. हा दुर्मिळ योग ४९९ वर्षांनी आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Diwali 2020: यंदाची दिवाळी करा अधिक गोड; घरीच बनवा ‘या’ Sweet Recipes

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -