Diwali 2021: म्हणून दिवाळीच्या रात्री खेळला जातो जुगार

diwali 2021 why play cards gambling on diwali night
Diwali 2021: म्हणून दिवाळीच्या रात्री खेळला जातो जुगार

दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण. दिवाळी दरम्यान विधीनुसार लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. उद्या ४ नोव्हेंबर गुरुवारी संपूर्ण देशात धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळीच्या रात्री धन प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अशा परिस्थितीत काही जुन्या परंपरा आहेत, ज्याचे पालन आजच्या काळात लोकं चुकीच्या पद्धतीने करत आहेत. दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे हे परंपरेशी संबंधित आहे. दिवाळीच्या रात्री का हा खेळ खेळला जातो आणि याची पौराणिक कथा काय आहे, हे ज्योतिषाचार्यांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत वृत्त आजतक या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ज्योतिष करिश्मा कौशिक यांनी याबाबत सांगितले की, दिवाळीच्या रात्री जुगार खेळण्याची एक वेगळी प्रथा आहे. घरात लक्ष्मी पूजननंतर कुटुंबातील सदस्य जुगार खेळतात. त्यामुळे दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे शुभ आहे की अशुभ असा प्रश्न विचारला जातो. पौराणिक कथेनुसार, दिवाळीत जुआर खेळणे शुभ आहे. पण जुगार पैसे लावून खेळणे हे अशुभ असते. ज्योतिषांनी कथेनुसार सांगितले की, दिवाळीच्या रात्री भगवान शिवशंकरांसोबत पार्वती देवी जुगार खेळायच्या. ज्यामुळे त्या दोघांमधील प्रेम वाढत गेले होते. यामुळे जुगार खेळणे शुभ मानले जाते.

पुढे ज्योतिष करिश्मा कौशिक म्हणाल्या की, जुगार खेळण्यादरम्यान जर तुम्ही पैसे लावता तर हे तुम्हाला बर्बाद करू शकते. प्रत्येक युगात जुगार हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. महाभारतामध्ये पांडवांनी जुगारात आपली सर्व धन-संपत्ती, एवढेच नाही तर आपल्या पत्नीला देखील दाव्यावर लावून हरले होते. त्याचबरोबर ग्रहांनुसार जुगाराचा राहुशी संबंधित लावला जातो. जर राहु शुभ स्थानावर असेल तर अशा व्यक्तींना जुगाराचे व्यसन लागते आणि असे लोकं कमवलेल्या सर्व गोष्टी गमावतात.

जुगार खेळायचा असेल तर मनोरंजनच्या दृष्टीने खेळा. जर तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत खेळाप्रमाणे खेळत असाल तर तुमच्यातील प्रेम वाढते. परंतु पैसे लावून जुगार खेळत असाल तर तुमच्यासाठी हे हानिकारक सिद्ध होईल. जुगार पैसे लावून खेळला तर लक्ष्मी नाराज होते आणि तुम्हाला वर्षभर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


हेही वाचा – Diwali 2021 : दिवाळीत लक्ष्मीच्या स्वागतासाठी करा ‘या’ गोष्टी