बर्फ खातायं?… तर मग सावधान!

Do you eat ice? ... then be careful!
बर्फ खातायं?... तर मग सावधान!

चौकमध्ये बर्फ साठवून ठेवण्याची अजब पद्धत पाहून तो खाणार नाही, आणि खाल्लाच तर रोगराईला निमंत्रण मिळणार हे नक्की आहे.लस्सी विक्रीचे ठिकाण असून, अनेकजण येथे लस्सी पिण्यासाठी येत असतात. या ठिकाणी ताक, लस्सी यांचे पार्सल देखील दिले जाते. मात्र यासाठी लागणारा बर्फ बाहेरून आणून तो सेफ्टी टँकच्या वर, तर कधी बाजूला भाताचे तूस आणि गोणपाटात ठेवला जातो. या सेफ्टी टँकजवळ नेहमीच घाण असते आणि त्याच्या आसपास अनेक श्वान फिरत असतात. उंदीर, घुशी यांचा वावर तर कायमच आहे. येथून लस्सीसाठी लागणारा बर्फ दुकानदार घेतो. हा बर्फ ताक आणि लस्सीत मिसळला जातो. ग्राहकाला याबाबत माहिती नसते. त्यामुळे तो लस्सी अथवा ताक बिनधास्तपणे पितो. विशेष म्हणजे येथील बर्फाची मोठ्या प्रमाणावर विक्री देखील होते.

हातगाडीवर शीतपेये विकणारे, मच्छी विक्रेते, गोळा, कुल्फी बनविणारे, विकणारे हा बर्फ गावोगावी घेऊन जात असल्याने रोगराईची साखळी निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही. बर्फ खाण्यासाठी योग्य आहे की नाही, हेही कळत नाही. मात्र बर्फ ठेवण्याची पद्धत अतिशय चुकीची असून, त्याने आजार आणि रोगाला आयतेच निमंत्रण दिले जाते आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.