घरक्राइमड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाच्या पत्नीची पाकिस्तानला भेट, एनसीबी घेणार शोध

ड्रग्ज माफिया आरिफ भुजवालाच्या पत्नीची पाकिस्तानला भेट, एनसीबी घेणार शोध

Subscribe

गेल्या आठवड्यात एनसीबीच्या एका विशेष पथकाने परवेज खान ऊर्फ चिंकू पठाणला अटक केली होती. परवेज हा करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊदचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्या चौकशीत आरिफचे नाव येताच या अधिकार्‍यांनी डोंगरी परिसरात त्याच्या निवासस्थानी छापा टाकला होता.

ड्रग्ज तस्करीचा मुख्य आरोपी आरिफ भुजवाला याची बेहिशोबी संपत्ती जप्त होण्याची प्रकिया नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने सुरु केली आहे. ड्रग्जच्या तस्करीतून आरिफने कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केली असून त्याची मिरारोड, मुंबई सेंट्रल आणि डोंगरी परिसरात सुमारे पाच कोटीची प्रॉपटी असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पाच महागड्या कार जप्त करण्यात आले असून लवकरच त्याच्या बँक खाती गोठविण्यात येणार आहे. दरम्यान आरिफची पत्नी पाकिस्तानात गेल्याचे तपासात उघडकीस आले असून तिच्या पाकिस्तान जाण्यामागे काय कारण होते याचाही तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात एनसीबीच्या एका विशेष पथकाने परवेज खान ऊर्फ चिंकू पठाणला अटक केली होती. परवेज हा करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊदचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्या चौकशीत आरिफचे नाव येताच या अधिकार्‍यांनी डोंगरी परिसरात त्याच्या निवासस्थानी छापा टाकला होता. यावेळी तिथे ड्रग्जचा कारखाना सुरु असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आला.

या कारवाईपूर्वी आरिफ हा पळून गेला होता, त्याचा शोध सुरु असताना त्याला माणगाव परिसरातून या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या एनसीबी कोठडीत असून या चौकशीत त्याने ड्रग्ज व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या मालकीचे मिरारोड, मुंबई सेंट्रल आणि डोंगरी परिसरात सुमारे पाच कोटी रुपयांची प्रॉपटी आहे, ही प्रॉपटी जप्त करण्याची प्रक्रिया एनसीबीने सुरु केली आहे.

- Advertisement -

त्याच्या राहत्या घरी या अधिकार्‍यांना एका शेतजमिनीचे काही कागदपत्रे सापडले आहेत. आरिफचे विविध बँकेत पाच ते सहा खाती आहेत, त्यात किती रुपये आहेत, या खात्यातून आतापर्यंत किती रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आरिफची पत्नी काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेली होती, आरिफच्या ड्रग्ज व्यवसायात तिचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. ती पाकिस्तानाला कशासाठी आणि कोणाला भेटण्यासाठी गेली होती याचा तपास सुरु असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दुसरीकडे एनसीबीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी अंधेरी, वसई आणि मिरारोड परिसरात छापे टाकले होते, ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती, त्यामुळे त्याचा तपशील समजू शकला नाही.


हेही वाचा – सेक्स करताना अतिउत्साहाने घेतला तरुणाचा प्राण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -