घरठाणेथर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी आलेला अंमली पदार्थ ठाण्यात जप्त; एनसीबीची कारवाई

थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी आलेला अंमली पदार्थ ठाण्यात जप्त; एनसीबीची कारवाई

Subscribe

थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी आलेला ४ किलो चरस आणि ११ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी आलेला अमली पदार्थाचा साठा मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर पकडण्यात आला आहे, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हि कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्याकडून सोमवारी करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थात ४ किलो चरस आणि ११ किलो गांजा मिळून आला आहे.जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ हा जम्मू काश्मीर येथून आली असल्याची माहिती समोर येत आहे.

अश्रफ मुस्तफा शाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जम्मू काश्मीर येथून थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चरस आणि गांजाची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती, या माहितीच्या आधारे सोमवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या टोल नाका, हॉटेल गोपाळ आश्रम या ठिकाणी सापळा रचून वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या अश्रफ मुस्तफा शाह याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या अश्रफच्या ठाण्यातील घरातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ४ किलो चरस आणि ११ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ जम्मू काश्मीर येथून मुंबईतील थर्टीफिर्स्टच्या पार्टीसाठी आंनाय्त आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अश्रफ मुस्तफा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती एनसीबीने परिमंडळीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – थर्टी फस्टसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -