घरताज्या घडामोडीपेण खारेपाट भागात घडतात ईको फ्रेंडली लाल मातीच्या ट्री गणेशमूर्ती

पेण खारेपाट भागात घडतात ईको फ्रेंडली लाल मातीच्या ट्री गणेशमूर्ती

Subscribe

पर्यावरणाचा समतोल राखण्यास तरुणांनाचा पुढाकार

गणपतीचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात पेण तालुक्याची ओळख आहे. पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव, दिव, तसेच परिसरातील इतर गावामध्ये गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. गतवर्षी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने निरोप दिल्यानंतर या वर्षी कोरोना, अतिवृष्टी यांचे संकट असताना  काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‌पेण तालुक्यांसह  खारेपाट भागातील कारखान्यात गणेशाच्या मुर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी खारेपाट भागाततील जेष्ठ मुर्तीकारासह सह तरुण तसेच महिला मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रदूषण विरहित लाल मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. या मूर्तीना मागणी जास्त असल्याने येथील मूर्तिकार रात्र दिवस मेहनत घेवन काम अंतिम टप्प्यात येऊन ठेपले आहे.
पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने प्रदूषण विरहित गणेशमूर्ती तयार करण्याचा विचार करुन लाल माती पासून ट्री गणेशमूर्ती म्हणजे लाल माती पासून गणेशमूर्ती बनवली जाते. त्यासोबत गणेशमूर्तीच्या आकाराची कुंडी व वनस्पती ची बी दिली जाते जेव्हा आपण गणेशमूर्ती चे विसर्जन करतो तेव्हा ही गणेशमूर्ती या कुंडी मधे विसर्जित केली जाते तसेच विसर्जन केल्यानंतर ती वनस्पतीची बी या कुंडीत टाकून काही दिवसांनी कुंडीत छानस रोपटे तयार होते या मुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होवून तयार झालेल्या वनस्पती पासुन निसर्गात आॅक्सीजन प्रमाण वाढून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. लाल मातीच्या या गणेश मुर्ती एक, दिड, दोन फुट आकाराच्या बनविल्या जातात यामध्ये एक फुटाच्या मुर्तींना विशेष जास्त मागणी आहे.
पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात पसरला आहे.यंदा किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे . वाशी खारेपाट भागात वाशी,कणे  ,बोर्झे ,वढाव ,दिव,भाल येथिल तरुण मंडळी शिक्षण असून नोकरी मिळत नाही त्यामुळे अनेक तरुण कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्यात वर्षभर व्यस्थ आहेत . यातून अनेक लोकांना रोजगार मिळतो. प्रदूषण विरहित ट्री गणेशमूर्ती चे  वितरण कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांसह परदेशातील आस्ट्रोलिया, अमेरिका, आशिया व युरोप खंडातील अनेक देशांमध्ये केले जाते.
पेण  खारेपाटात भागातील कारखान्यात प्रदूषण विरहित गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे  लाल मातीपासून ही मुर्ती बनवली जाते. या  मूर्तीला लागणारी माती शाडूच्या मातीपेक्षा महाग आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या मुर्ती सोबत कुंडी व वनस्पतीचे बी दिले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -