घरताज्या घडामोडीEid-e-Milad-un-nabi 2021: आज साजरी केली जातेय ईद-ए-मिलाद; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Eid-e-Milad-un-nabi 2021: आज साजरी केली जातेय ईद-ए-मिलाद; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Subscribe

आज सर्वत्र इस्लाम समुदाय ईद-ए-मिल-इ नबीचा (eid milad 2021) सण साजरा करत आहेत. हा दिवस इस्लामी लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी इस्लामचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यूही झाला होता.

ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) किंवा मालविद (Mawlid) च्या नावाने ओळखला जातो. हा सण भारतासह जगभरातील अनेक देशांमधील मुस्लिम समुदाय लोकं मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. तसेच यादिवशी मोहम्मद यांचा जन्मदिवस असल्यामुळे या खासप्रसंगी मिरवणुका काढल्या जातात.

- Advertisement -

इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात ईद-ए-मिलाद-उन-नबी सण जगभरात साजरा केला जातो. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि उपखंडाच्या इतर भागांमध्ये आज ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरा केला जातो. सुन्नी आणि शिया समुदाय वेगवेगळ्या दिवशी ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरा करतात.

ईद-ए-मिलाद-उन-नबीचा इतिहास

मुस्लिम समुदायासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यातील १२ तारखेला पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. इस्लामिक समुदायाच्या मान्यतेनुसार, पैगंबर मोहम्मद यांचा जन्म इ.स. ५१७ मध्ये झाला. माहितीनुसार, सर्वात पहिल्यांदा ईद-ए-मिलाद सण मिस्त्र साजरा केला होता. ११ व्या शतक आल्यापासून जगभरात हा सण साजरा केला जातो.

- Advertisement -

ईद-ए-मिलाद-उन-नबीचे महत्त्व

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी काही ठिकाणी मिरवणुका काढल्या जाता. तर काही ठिकाणी मशिदमध्ये नमाज पठण केले जाते. तसेच या खास दिवसानिमित्ताने मशिद सजवली जाते आणि पवित्र ग्रंथ कुरान सर्व जण वाचतात. तसेच मोहम्मद यांचे विचाराची प्रसारणा केली जाते. शिवाय या दिवशी पारंपारिक स्वादिष्ट जेवणे बनवले जाते आणि गरीबांना वाटले जाते. या दिवशी दान केल्याने अल्लाह प्रसन्न होतो आणि कुटुंबात समृद्धी येते, असे मानले जाते.


हेही वाचा – Diwali Faral : तळण्यात घाण्याचे तेलच उत्तम! आहार तज्ज्ञांचा सल्ला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -