घरक्राइमसंतापजनक! ५ महिन्यांपासून तरुणीवर १७ जणांनी केला बलात्कार; ८ जणांना अटक

संतापजनक! ५ महिन्यांपासून तरुणीवर १७ जणांनी केला बलात्कार; ८ जणांना अटक

Subscribe

१५ वर्षाच्या पीडितीवर पाच महिने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बलात्कार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच नाही तर कर्नाटकातही अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक संतापजनक घटना कर्नाटकमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर १७ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुख्य आरोपी पीडितीची मावशी असल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

कर्नाटकमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय तरुणीच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडिती तिच्या मावशीकडे राहत होती. तसेच मावशीला मदत म्हणून ती दगड फोडणाऱ्या कंपनीत कामाला जायाची. त्या दरम्यान, तिची गिरीश नावाच्या एका बस चालकासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी तिचा नंबर मागवून तिच्याशी ओळख केली. ओळख झाल्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर तो तेवढण्यावरच थांबला नाही. त्यांनी तिचा फोन नंबर अभी या मित्राला दिला. त्यानंतर त्यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडिओ काढले आणि धमकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला.

- Advertisement -

१७ जणांकडून बलात्कार

३० जानेवारी रोजी कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षाच्या तरुणीवर १७ जणांनी बलात्कार आणि लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले.

पीडितेची मावशी मुख्य आरोपी

आई नसल्यामुळे पीडिती मावशीकडे राहत होती. या गुन्ह्यात मावशी मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह गिरीश, विकास, मणिकांत, संपत, अश्वतगौडा, राजेश, अमित, संतोष, दीक्षित, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, मुलीची मावशी आणि दगड फोडणाऱ्या कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! प्रेमीयुगलांची रेल्वेखाली आत्महत्या


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -