घरताज्या घडामोडीऑगस्ट अखेरपर्यंत नवी मुंबईत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

ऑगस्ट अखेरपर्यंत नवी मुंबईत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

Subscribe

पुढील वर्षभरात नवी मुंबईत ठिकठिकाणी २० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरु करण्यात येणार

पर्यावरण पूरक प्रवासासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याच्या कामाला नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गती दिली असून ऑगस्ट अखेरपर्यंत नवी मुंबईतील पहिले इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. (Electric charging stations in Navi Mumbai till end of August)  पुढील वर्षभरात नवी मुंबईत ठिकठिकाणी २० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरु करण्यात येणार असल्याचे देखील शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. नवी मुंबई आरटीओच्या नोंदणीप्रमाणे नवी मुंबईत दुचाकी आणि चारचाकी अशा ४०० गाड्यांची नोंद झाली आहे. शहराची भविष्यतील गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हे महत्वाचे पॉल उचलले आहे. त्याअनुषंगाने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्यासह नवी मुंबई परिवहन सेवेचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, उप अभियंता यशवंत कापसे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यास प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्र सरकारच्या फाम योजनेअंतर्गत सध्या ३० इलेक्ट्रिक बसेस शहरात धावत असून १०० इलेक्ट्रिक बसेस पुढील काही दिवसात सुरू होणार आहेत.

- Advertisement -

त्याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने जलदगतीने कार्यवाही करीत नवी मुंबईत २० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरु करण्याचा प्रस्ताव तयार केला असून पॉवर ग्रीड कार्पोरेशन या केंद्र सरकारच्या कंपनीला सदर कामासाठी नेमण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका सदर उपक्रम केंद्र सरकारचे अनुदानाने राबवित असून एका इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी दीड कोटी रुपये इतका खर्च आहे. प्रत्येक स्टेशनला २० लाख रुपये सरकारचे अनुदान मिळणार उर्वरित सर्व खर्च पॉवर ग्रीड कार्पोरेशन हि कंपनी करणार आहे. पुढील वर्षभरात नवी मुंबईत वीसही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरु करून भाविषयात आणखी १० स्टेशन्स सुरु करण्याचा प्रशासनाचा मनोदय असल्याचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

भविष्यत इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणाला देखील आला बसणार आहे. इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग नॉर्मल मशीन किव्हा घरच्या मीटरवर करताना साधारणतः ८ तास लागतात, मात्र इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सवर साधारणतः अर्धा तास लागणार आहे, त्यामुळे वेळीदेखील वाचू शकणार असल्याचे शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिका शाळेत ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करा

ऑगस्ट अखेरपर्यंत नवी मुंबईत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -