घरताज्या घडामोडीखडसेंच्‍या हातावर घड्याळ

खडसेंच्‍या हातावर घड्याळ

Subscribe

शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यासाठी एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे या खासगी हॅलिकॉप्टरने गुरूवारी मुंबईत दाखल झाले आहेत. खडसे यांचे जळगावमधील अनेक कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार तयारी पक्षाने केली असून, ज्येष्ठ नेते प्रवेशावेळी उपस्थित राहणार आहेत.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी प्रवेश करण्यासाठी गुरुवारी एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून खासगी हेलिकॉप्टरने मुंबईला आलेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा आहेत. खडसे यांच्यासोबत जळगावमधील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्याला स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित राहतील.

- Advertisement -

माझ्यासोबत सर्वपक्षीय १५ माजी आमदार-खडसे 

 माझ्या पाठीशी १५ ते १६ सर्वपक्षीय माजी आमदार आहेत. ते शुक्रवारी माझ्यासोबत मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही सोबत आहेत; पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगरात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या भागात नेतृत्व नसल्यानेच मी राष्ट्रवादीची निवड केल्याचेही स्पष्ट केले. खडसेंच्या या वक्तव्याने भाजपअंर्तगत खळबळ उडाली आहे. दरम्यान, खडसे हे मुक्ताई नगर येथून हेलिकॉप्टरने गुरूवारी मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, पत्नी मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा, मुलगी रोहिणी खडसेदेखील आहेत. याशिवाय खडसे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जळगावहून खासगी वाहनांनी अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -