घरताज्या घडामोडीरोहा-माणगाव स्थानकांवर एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा

रोहा-माणगाव स्थानकांवर एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा

Subscribe

खासदार सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवा-रोहा (मेमू) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर रोहा-पनवेल, रोहा-दिवा पॅसेंजर यासह नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा तसेच मांडवी एक्सप्रेसला व माणगाव स्थानकांवर ओखा एक्सप्रेस, बिकानेर एक्सप्रेस व मरुसागर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रामुख्याने केली. याबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अनुकूलता दर्शविली असून रोहा-अष्टमी तसेच निडी खारपडी येथील दोन्ही पुलांच्या कामासाठी तात्काळ निधी देण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. या बैठकीस उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर, मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरद गोयल, महाव्यवस्थापकांचे सचिव श्री. साकेत मिश्रा उपस्थित होते.


हे ही वाचा – आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -