घरक्राइमतोतया पोलीस अधिकार्‍याच्या आवळल्या मुसक्या

तोतया पोलीस अधिकार्‍याच्या आवळल्या मुसक्या

Subscribe

आठवड्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून पाऊण लाखाला गंडा घालणार्‍या अबालू जाफर इराणी (47, रा. विष्णूकृपा नगर, शिवाजीनगर, पुणे) याला नगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. इराणी याने राज्यात अनेक ठिकाणी तोतया पोलीस अधिकारी बनून गुन्हे केल्याचे तपासात समोर येत आहे. आठवड्यापूर्वी अशोक हरी प्रधान (72, रा. खोपोली लक्ष्मीनगर) हे दुचाकीवरून पळसदरी येथे मठात जात असताना मस्त मालवणी हॉटेलजवळ इराणी याने प्रधान यांना थांबविले. त्याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगत प्रधान यांना दम देत अंगावर सोन घालून कशाला फिरता, जीवाला धोका असल्याचे सांगितले. प्रधान यांचे मोबाईल, पैशाचे पाकीट, सोन्याचे दागिने काढून रूमालात बांधून ठेवा, असे सांगत रूमालाची गाठ बांधण्याचा बहाणा करत हातचलाखीने रूमालाची अदलाबदल केली होती. जवळपास पाऊण लाखाचा ऐवज घेऊन इराणीने पळ काढला.

प्रधान यांनी येथील पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपीच्या मागावर होते. एपीआय शेखर लव्हे, हवालदार पंकज खंडागळे, नाईक रणजीत खराडे, दत्तात्रेय किसवे, विशाल सावंत, शिपाई अक्षय लोखंडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे नगरमधील श्रीरामपूर येथून इराणीला ताब्यात घेतले. त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, इराणी हा ज्येष्ठ नागरिकांना हेरून पोलीस अधिकारी असल्याचे सांगत असे. प्रधान यांची फसवणूक केल्यानंतर त्याच दिवशी पेण हद्दीत देखील 70 वर्षीय व्यक्तीला अशा प्रकारे त्याने लुटल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबई लोकलचे तिकिट मिळणार दिवाळीच्या मुहूर्तावर? संयुक्त बैठकीत निर्णय अपेक्षित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -