घरठाणेराष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीवर उपासमारीची वेळ: शासनाला पुरस्कार करणार परत

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीवर उपासमारीची वेळ: शासनाला पुरस्कार करणार परत

Subscribe

सरकारी उदासीनतेमुळे स्वतःच्या आणि हजारो आदिवासी कुटुंबाची उपासमार होत असल्यामुळे राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या वीरबाला हाली बरफने तिचा राष्ट्रीय पुरस्कार शासनालाच परत देण्याचा निर्णय घेतला आहे. उपाशीपोटी या पुरस्काराने भूक भागणार नाही असा सवाल या निर्णयावर हाली बरफ हिने शासनाला विचारला आहे.

स्वातंत्र्य मिळवून पाऊणशे वर्षे उलटून देखील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या वीरबाला हाली बरफ परिवाराची दरदिवशी होणारी उपासमार परवड सरकारी यंत्रणेला शरमेने मानखाली घालणारी ठरली आहे. शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन नोंदणी नसल्याने गावातील, खेड्यापाड्यात, जंगलातील वस्ती मधील गरीब आदिवासी कुटुंबांना हा निर्णय अवगत नाही. या निर्णयामुळे कोरोना महामारी आणि लॉकडाऊन कालावधीत हाली बरफ परिवाराबरोबर हजारो आदिवासी कुटुंबांना अक्षरशः भुकबळीच्या मार्गावर लोटण्यात आले आहे. शिधापत्रिकेवरील अन्नधान्य विना वंचित राहावे लागत असल्याने खुद्द हाली बरफ कुटुंब देखील हलाखीच्या परिस्थितीत कसेबसे जीवन जगत आहेत. कित्येकांच्या हाताला काम नाहीत, पैसे नाहीत. रेशनिंग दुकानात ऑनलाईन नोंदणी नसल्यामुळे अन्नधान्य मिळेनासे झाले आहे. जंगलातील वनस्पती उकडून आणि रानमेवा खाऊन उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

तानसा अभयारण्य जंगलात वाघाच्या तावडीतून स्वतः चा जीव धोक्यात घालून सुटका करून हाली बरफने मोठ्या बहिणीला वाचविले होते. २०१२ साली केंद्र सरकारने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय बाल कल्याण परिषदचा वीरता पुरस्कार म्हणून बालशौर्य पुरस्कार हाली रघुनाथ बरफ हिला दिला होता. रातांधळे गावात विवाहित हाली बरफ उर्फ राम कुवरे सोबत तिघा लहान मुलांचा परिवार राहतो आहे. विवाहानंतर श्रमजीवी संघटनेने हालीची दुर्लक्षित अवस्था पाहून संपर्क साधला. घरकुल. पिवळी शिधापत्रिका व आश्रमशाळा मध्ये तात्पुरती रोजंदारी तिला मिळवून दिली.
कोरोना महामारीमध्ये आश्रमशाळा बंदीने हाली रोजंदारीला मुकली. सातत्याने होणारा लॉकडाऊन आणि शिधापत्रिका वरील अन्नधान्य न मिळाल्याने उपासमारीने हाली बरफ उर्फ राम कुवरे कुटुंब कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत.

आदिवासी भागात या शिधापत्रिकाधारकांना सरकारी निर्णयाचा गंभीर परिणाम भोगावा लागला आहे. ऐन पावसाळ्यात तर अन्नधान्य विना हजारो आदिवासी कुटुंबांना भूकबळीची भीती वाटत आहे. या भीतीपोटी आणि सरकारी यंत्रणेची उदासिनता पाहता श्रमजीवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी काल भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना लेखी स्वरूपात पत्र लिहून येत्या ९ जून रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयात बाल शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ राष्ट्रीय पुरस्कार शासनाला परत करणार आहेत, असे सा्ंगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -