घरताज्या घडामोडी माथेरानच्या दबंग पोलीस अधिकार्‍याचा सन्मान चर्चेत

 माथेरानच्या दबंग पोलीस अधिकार्‍याचा सन्मान चर्चेत

Subscribe

खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून त्यांचा परिचर हात रिक्षा चालक, घोडे वाला तसेच कुली या सारख्या सामान्यांचेही कौतुक मिळाले.

सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेला असतो.पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सहकार्‍यांना दिलेली वागणूक, यासारख्या गोष्टी तुमची ओळख सांगते. अशाच एका कर्तृत्ववान आणि दबंग पोलीस अधिकार्‍याचा सन्मान चर्चेत आला आहे. सहाय्यक निरीक्षक म्हणून माथेरान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्याही वाट्याला असाच सन्मान आला आहे. त्यांची पेण पोलीस ठाण्यात बदली झाली. तेव्हा निरोप देताना माथेरानकरांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत निरोप दिला.

माथेरान पोलीस ठाण्याचा कार्यभार पाहताना सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सामाजिक बांधिलकी जोपासत माथेरान मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत शिक्षण क्षेत्रासाठी भरीव योगदान देत,कोरोना महामारीच्या परिस्थितीत तसेच निसर्ग, तोक्ते चक्रीवादळाच्या संकट काळात नागरीकांची काळजी घेतली. याकाळात रात्रंदिवस मेहनतीने काम करून लोकांना त्यांनी आपलेसे केले. माथेरानमध्ये घडणार्‍या अपघातत रेस्क्यू ऑपरेशन करणार्‍या सह्याद्री टीम सोबत मार्गदर्शक म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना वाचवले. खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून त्यांचा परिचर हात रिक्षा चालक, घोडे वाला तसेच कुली या सारख्या सामान्यांचेही कौतुक मिळाले.

- Advertisement -

काळे यांची नुकतीच बदली झाली आहे. हा स्थानिकांना धक्काच होता. अनेकांनी बदली होताच नाराजी व्यक्त केली. बदली निमित्त त्यांना निरोपाचा कार्यक्रम स्थानिकांनी आयोजला होता. या निरोपावेळी पुरुषांसह उपस्थित महिलांनी फुलांच्या वर्षावात काळे यांना निरोप दिला. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पूष्प देऊन सत्कार केला. आणि दुतर्फा उभे राहून काळे यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. माथेरानकरांच्या या प्रेमाने सहाय्यक निरीक्षक भारावून गेले.

-दिनेश सुतार

- Advertisement -

हेही वाचा – नेत्यांनी बोलताना पथ्य पाळावीत, गिरीश बापट यांचा नारायण राणेंना घरचा आहेर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -