घरताज्या घडामोडीचर्चेची पाचवी फेरीही निष्फळ देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर

चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर

Subscribe

कृषी कायद्याविरोधात सुरू झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनात नवव्या दिवसानंतरही तोडगा निघू शकला नाही. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा निष्फळ ठरली. कायदे मागे घ्या, ही एकच मागणी शेतकर्‍यांनी लावून धरल्याने मोदी सरकारची पुरती कोंडी झाली आहे. विशेषत: कॅनडाबरोबरच आता संयुक्त राष्ट्रसंघानेही शेतकरी आंदोलनाची दखल घेत शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्याचे सुतोवाच केले. जगभरात या आंदोलनाची दखल घेतली जात असल्याने मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे.

शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे दिल्लीच्या सगळ्या वेशी रोखल्या गेल्या आहेत. दिवसागणिक इतर राज्यांतील शेतकरीही दिल्लीच्या सीमा गाठत आहेत. केंद्राने पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नव्याने गाझीपूर सीमेवरही शेतकर्‍यांनी चक्काजाम केला आहे. गाझीपूर येथे लासपूर आणि उत्तराखंडमधील शेतकरी येऊ लागले आहेत. हे शेतकरी दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरील शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे एनसीआरमधील अनेक मार्ग बंद झाले आहेत. विशेष म्हणजे आंदोलक शेतकर्‍यांना स्थानिक नागरिकांचेही सहकार्य मिळत असल्याचे पाहायला मिळते. नोएडा लिंक रोडही आंदोलनामुळे बंद पडला आहे.

- Advertisement -

दरम्यान, शेतकर्‍यांशी चर्चा करणारे कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी एपीएमसीला बळकटी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे म्हटले. आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी जर शेतकरी नेत्यांनी प्रस्ताव दिले तर आम्ही त्यांचा विचार करु, असे तोमर म्हणाले. मोदी सरकार शेतकर्‍यांचे असून, शेतकर्‍याला समृद्ध करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. पण शेतकर्‍यांच्या कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ते काहीही बोलले नाहीत. दिल्लीतील वाढत्या थंडीचा परिणाम आंदोलनातील लहान मुलांवर होण्याची शक्यता लक्षात घेता लहान मुले आणि वृध्द यांना घरी पाठवण्याची विनंती मंत्र्यांनी केली.

दिलजीत दोसांजचा पाठिंबा
अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिलजीत दोसांज सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी पोहचला आहे. आमची सरकारला ही विनंती आहे की शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या. संपूर्ण देश शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा आहे, असेही दिलजीत दोसांजने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -