घरताज्या घडामोडीFarmers Protest: लाल किल्ला हिंसाचारात आतापर्यंत १२४ जणांना अटक

Farmers Protest: लाल किल्ला हिंसाचारात आतापर्यंत १२४ जणांना अटक

Subscribe

रॅलीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार प्रियंका गांधी

दिल्लीतील लाल किल्ल्यात १६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठा गदारोळ माजला होता. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला होता. यावेळी ट्रॅक्टर रॅली करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या लाल किल्ल्याच्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी काठी आणि तलवारीने हल्ला केला असल्याचे दृष्य व्हायरल झाले होते. लाल किल्ल्यावरील हल्ल्यात शेतकऱ्यांनी नुकसान केली आहे. हल्ल्यानंतर दिल्ली पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हजारो कॅमेऱ्यांच्या फुटेजचा डाटा पोलीस आता तपासत आहेत. दिल्ली क्राइम ब्रांच पोलिसांनी धर्मेंद्र सिंह हरमन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. धर्मेंद्रला व्हिडिओ फुटेज आणि हल्ल्यात उपस्थित असल्यामुळे अटक केली आहे. या हिंसाचारात एकूण १२४ लोकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र लाल किल्ल्यात झालेल्या हिंसेवेळी आंदोलनात सामील होता. हिंसाचारात तोडफोड आणि मारहाण करण्यात धर्मेंद्र दिसत होता. तो दिल्लीचा असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मेंद्रला ताब्यात घेतले आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये धर्मेंद्र गाडीवर चढल्याचे दिसत होते. फुटेजवमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मेंद्रचं २६ जानेवारीचे लोकेशन बघितले तर ते लाल किल्ल्यावरचेच असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

लाल किल्ल्यातील हिंसाचारानंतर आतापर्यंत पोलिसांनी १२४ लोकांना अटक केली आहे. ४४ एफआईआर दाखल करण्यात आल्या आहेत. यामधील १४ प्रकरणांचा तपास दिल्ली पोलिस क्राइम ब्रांच करत आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. तपास सुरु असून क्राइम ब्रांचची टीम अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे.

लाल किल्ला हिंसाचारातील आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जनतेला आवाहन केले होते. तुमच्याकडे हिंसाचाराचे फोटो किंवा व्हिडिओ असल्यास आम्हाला पाठवा असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी आतापर्यंत पोलिसांना हजारो व्हिडिओ आणि फोटो पाठवले आहेत. याचा उपयोग हल्लेखोरांना पकडण्यासाठी होत आहे.

- Advertisement -

रॅलीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार प्रियंका गांधी

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी रामपूरला जाणार आहेत. प्रियंका गांधी गुरुवारी रामपूरमध्ये नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांना भेटतील असे काँग्रेसचे ललन कुमार यांनी सांगितले. ट्रॅक्टर रॅलीत एक ट्रॅक्टर उलटला होता. याच ट्रॅक्टरच्या खाली दबल्याने नवरीत यांचा मृत्यू झाला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -