घरक्राइमअरे बापरे! आता सासऱ्याने सूनेसोबत बांधली लग्नगाठ, मुलाने घेतली पोलिसात धाव

अरे बापरे! आता सासऱ्याने सूनेसोबत बांधली लग्नगाठ, मुलाने घेतली पोलिसात धाव

Subscribe

प्रेम अंधळं असतं. ते कोणावरही जडतं. त्याला कोणतीच वयोमर्यादा नसते. अशीच घटना काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली होती. सासूने थेट जावयासोबत लग्न केल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात घडली आहे. येथे सासऱ्याने आपल्या मुलाच्या बायकोसोबत संसार थाटला आहे. याप्रकारानंतर मुलाने पोलिसात थेट धाव घेतली आहे. बदायूं जिल्ह्यातील एका व्यक्तीने बायकोच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाच्या बायकोसोबत लग्नगाठ बांधली. स्वतःच्या दोन मुलांना सोडून त्या व्यक्तीने मुलाच्या बायकोसोबत दुसऱ्या शहरात जाऊन संसार थाटला. जेव्हा मुलांच्या समोरील आर्थिक संकट अधिक गडद झाले, तेव्हा हे प्रकरण जास्त तापले. मोठ्या मुलांच्या तक्रारीनंतर बदायूं एसपीच्या समोर संपूर्ण घटना आली. ज्यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.

बदायूं जिल्ह्यातील कस्बा बिसौलीच्या दबतरा गावातील राहणार हा व्यक्ती ४५ वर्षांचा असून त्याचे नाव देवानंद असे आहे. २०१५ साली त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस देवानंदचे वय ३९ होते. देवानंदला त्यावेळेस नातेवाईकांनी दुसरे लग्न करून आपला संसार थाटण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यावेळेस देवानंदने १५ वर्षांचा मुलगा सुमितचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ साली सुमितचे लग्न केले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर सुमित आणि त्याच्या बायकोमध्ये वाद निर्माण होऊ लागला, ज्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. यादरम्यान सुमितच्या बायकोचे सासऱ्यासोबतची जवळीक वाढली.

- Advertisement -

मग २०१७मध्ये देवानंदने असा निर्णय घेतला, ज्यामुळे सुमितला आश्चर्याचा धक्का बसला. देवानंदने सुमितच्या बायकोसोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले आणि वेगळ्या जिल्ह्यात जाऊन राहिले. मग देवानंदला मुलगा झाला, जो आता एक वर्षाचा आहे. यादरम्यान अजूनही देवानंद आपल्या मुलांना सांभाळत होता. सुमितला दारू आणि जुगार खेळण्याचे व्यसन होते. पैशाची गरज वडील देवानंद भागवत होता. परंतु काही दिवसांनंतर देवानंदने पैसे देणे बंद केले. यानंतर सुमितने वकीलाच्या बोलण्यावर देवानंदच्या वेतनासंबंधीत माहिती RTIच्या माध्यमातून मागितली. याशिवाय त्यांनी एक तक्रार दाखल करून पोलिसांना बायकोला शोधण्याची विनंती केली होती.

याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी देवानंद आणि त्याचा मुलगा सुमितला पोलीस ठाण्यात बोलावले. ठाण्यात सुमित आपल्याला सांभाळण्याची आणि खर्चाची मागणी करू लागला. त्यादरम्यान वडील आणि मुलामध्ये तुफान वाद झाला. ज्यानंतर पंचायत झाली, ज्यामध्ये सुमितच्या बायकोने सासऱ्यासोबत राहायला सांगितले. तिने सांगितले की, सासरे त्याचे वडील आहेत. सासऱ्याने तिच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! सासूने पटवलं जावयाला, लेकीचा थयथयाट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -