घरक्राइमतरुणीचं मॅट्रिमोनियल साईटवर ठरलं लग्न; होणाऱ्या नवऱ्याने ८ लाखाला लावला चुना

तरुणीचं मॅट्रिमोनियल साईटवर ठरलं लग्न; होणाऱ्या नवऱ्याने ८ लाखाला लावला चुना

Subscribe

अनेक जण लग्न ठरतं नसेल तर ऑनलाईन उपलब्ध झालेल्या मॅट्रिमोनियल साईटची मदत घेतात. मात्र काही वेळा हिच मदत महागात पडते आणि फसवणूक होते. अशीच फसवणूक एका तरुणीची झाली आहे. मॅट्रिमोनियल साईटच्या मदतीने ठरलेलं लग्न तरुणीसाठी डोके दुखी झाली आहे. ८ लाख रुपयांची लुटू करूनही अजूनही तरुणीकडून पैशाची मागणी केली आणि पैसे देण्यास नकार दिल्यावर होणाऱ्या नवरा आणि त्याच्या बहिणीने तिला डांबून मारहाण केली. पण आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित तरुणीने गोमतीनगर क्षेत्रातील पोलिस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केला आहे.

वरदानखंड येथे राहणाऱ्या तरुणीच्या म्हणण्यानुसार, २०१९मध्ये मॅट्रिमोनियल साईटवर तिला विवेक पांडे नावाच्या व्यक्तीबद्दल समजले. विवेकच्या प्रोफाइमध्ये सरकारी कंत्राटदार असल्याचा उल्लेख होता. जे पाहून तरुणीने विवेकला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तिच्यासोबत बातचित करताना विवेकने महिन्याला १ लाख रुपये कमवतो असे सांगितले. सर्व काही ठरल्यानंतर साखरपुड्यासाठी विवेकने एक हॉटेल बुक केले. याच्यासाठी आरोपी विवेकने तरुणीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाचा खर्च अर्धा-अर्धा करण्याचे ठरले होते. ज्यानंतर तरुणीकडून ५ लाख रुपये घेतले गेले.

- Advertisement -

यानंतरही विवेक आणि त्याच्या बहिणीने पैशाचे मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी तरुणीला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले. तिथे तिला मारहाण केली आणि छोट्या भावाकडून पैसे घे असा तिच्यावर दबाव टाकला. तरीही तरुणीने काही ऐकले नाही. पण त्याच दिवशी ती कशीबशी त्याचा तावडीतून सुटली. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, १५ला ती घरी होती. तेव्हा विवेक त्याची बहीण नेहाला घरी घेऊन आला. मग दोघांनी तरुणीला आपल्यासोबत घेऊ जाण्याचा हट्ट केला. तरुणीने नकार दिल्यावर तिच्याच घरात तिला मारहाण केली. मग छोटा भाव धावत आला. तेव्हा विवेकने भावाला ढकलून एका खोलीत बंद केले. मग एका बंद खोलीत नेऊन तिला मारहाण केली.

तरुणी त्याचं काही ऐकत नसल्यामुळे त्याने तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीकडून सुटल्यानंतर अनेक दिवस तरुणी नैराश्यमध्ये होती. याबाबत तिने विवेकला आईला सांगितले. परंतु ती पण मुलाच्या बाजूने होती. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर २९ मेला तरुणीने गोमतीनगर क्षेत्रातील पोलीस ठाण्यात विवेक पांडे आणि त्याची बहीण नेहा आणि आई कांति विरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! पतीने झाडं कापण्यास नकार दिल्यामुळे गर्भवती पत्नीवर मुलांसमोर केला बलात्कार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -