नवरी फोनवर बोलली म्हणून हनिमूनच्या रात्री झाली तुफान हाणामारी!

नवऱ्यासह सासरकड्याच्या पाच सदस्यांवर गुन्हा दाखल केला.

wedding
wedding

अग्नीला साक्षी मानून वर-वधू सात जन्म साथ देण्याचे वचन घेतात. पण सध्या नवरा-बायको मधील वाद वाढले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हनिमूननच्या रात्रीच नवरा-बायकोमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. सासरी पोहोचताच नवरा आणि बायकोमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

नक्की काय घडले?

नवरा विशालने दिलेल्या जबाबानुसार, ‘बायको लग्नाच्या वेळी स्टेजवर पोहोचली आणि त्यानंतर ती फोनवर सतत कोणाशी तरी बोलत होती. हे पाहून घरात खुसूर-फुसूर सुरू झाली. फोनवर बोलण्याविषयी प्रश्न विचारला असता बायको नवऱ्यावर भडकली. याच गोष्टीमुळे वादावाद झाल्यानंतर मारहाण झाली.’ याप्रकरणी नवरा-नवरी दोघांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. या नवरा-बायकोच्या वादाच्या सासरकडचे इतर सदस्य सामील झाले. नंतर सर्वांनी मिळून बायकोला बेदम मारहाण केली. रडरडत बायकोने कशाप्रकारे ती हनिमूनची रात्र घालवली. मग पुढच्या दिवशी सकाळ झाल्या झाल्या नवरीने मारहाण झाल्याची माहिती माहेरी कळवली. मग यानंतर माहेरकडची लोकं सासरी पोहोलचे आणि वादाला पुन्हा सुरुवात झाली.

बायको सासरी राहण्यास तयार नव्हती तिची माहेरी राहण्याची इच्छा होती. मंगळवारी आपल्या आईसोबत नवरी पुरंदरपुर ठाणे पोलिसात पोहोचली. तिथे जाऊन बायको ठाणे अध्यक्षला सर्व घटनेची माहिती दिली आणि महिला पोलिसांना तिने जखमी झाल्याच्या खुना दाखवल्या. पोलिसांनी बायकोच्या आईच्या तक्रारीनुसार नवरा विशालसह सासरकडच्या पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.

बायकोने सांगितले की, ‘सासरी गेल्यानंतर कसाबसा दिवस संपला. नवरा खोलीत आलाच नाही. सासरचे लोकं त्याला खोलीत पाठवत होते. पण तो खोलीत येण्यास तयार नव्हता. खूप वेळा सांगितल्यानंतर नवरा खोलीत आला आणि अभद्र भाषेत बोलू लागला. त्याला विरोध केला तेव्हा तो मारहाण करू लागला. त्यानंतर सासरकडचे सर्व लोकं नवऱ्याच्या बाजूने झाले आणि हुंड्यावरून मारहाण करू लागले.’


हेही वाचा – बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहित शेतकऱ्याची आत्महत्या