‘स्वातंत्र्य ही भीक’ असं म्हणणाऱ्या नाचणारीण बाईवर देशद्रोहाचा खटला दाखल करा – विजय वडेट्टीवार

'स्वातंत्र्य ही भीक' असं म्हणणाऱ्या नाचणारीण बाईवर देशद्रोहाचा खटला दाखल करा - विजय वडेट्टीवार

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्ञात, अज्ञातांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्या महात्म्याने संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी समर्पित केले तो इतिहास ज्ञात असताना कोण, कुठली नाचणारीण बाई उठते आणि म्हणते स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे. तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा, असा घणघणात अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव न घेता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.

तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, महाड-पोलादपूर-माणगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नानासाहेब जगताप, तालुकाध्यक्ष अजय सलागरे, माजी सभापती दिलीप भागवत, उपसभापती शैलेश सलागरे, श्रीयश जगताप आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घराघरात, गावोगावी, तसेच नगर पंचायतीच्या वॉर्डात काँग्रेस पक्षाने केलेले काम, जनतेच्या हिताच्या योजना पोहचवा, आपण स्वतः आणि पक्ष तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाहीही वडेट्टीवार यांनी दिली. वाढती महागाई आणि सरकारी कंपन्यांचे खासगीकरण यावरून त्यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले. जिल्हाध्यक्ष घरत, अ‍ॅड. ठाकूर आणि नगराध्यक्षा जगताप यांचीही भाषणे झाली. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हे ही वाचा – कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा…विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय