घरताज्या घडामोडीविद्यापीठ ऑनलाई परीक्षा सायबर हल्ल्याची पोलीस तक्रार दाखल

विद्यापीठ ऑनलाई परीक्षा सायबर हल्ल्याची पोलीस तक्रार दाखल

Subscribe

मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ प्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होती. मात्र, ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी जवळपास अडीज ते 3 लाख लोकांनी हे अ‍ॅप ओपन केल्याचा प्रकार समोर आला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यापीठाच्या तांत्रिक टीमसोबत बैठक घेतली. तसेच मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून मुंबईचे कायदा-सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि कुलगुरूंमध्ये बैठक झाली आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, परीक्षेची पूर्ण सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा सायबर हल्ला असल्याने या संदर्भात कुलगुरुंनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान केले जाणार नाही. या सार्‍या प्रकरणात चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. मुंबईचे कायदा आणि सुववस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कुलगुरु यांची याच संदर्भात बैठक झाली.
9 हजार मुलांच्या परिक्षेचे नियोजन मुंबई विद्यापिठाने चांगल्या प्रकारे केलं होतं. विद्यापीठाने आणखी चांगली यंत्रणा उभी करुन परीक्षा घ्यावी, अशा सुचना कुलगुरुंना दिल्या आहेत, अशी माहितीही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे ऐन परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -