ठाण्यात सिनेमा स्टार मूवी थेटरच्या कॅफेट एरियाला आग

कापूरबावडी येथील हाय स्ट्रीट मॉलच्या (High Street Mall) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सिनेपाँलीस मूवी थेटरच्या कॅफेट एरिया (स्नॅक्स कॉर्नर) या भागामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.

कापूरबावडी येथील हाय स्ट्रीट मॉलच्या (High Street Mall) तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सिनेपाँलीस मूवी थेटरच्या कॅफेट एरिया (स्नॅक्स कॉर्नर) या भागामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर तब्बल ५ तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी झालेल्या धुराचा अग्निशमन दलाच्या तीन फायरमन यांना त्रास झाला तर एका फायरमनच्या हाताला काच लागल्याने दुखापत झाली आहे. त्या चौघांची प्रकृती स्थिर आहे. त्या चौघांना ठाणे महापालिकेच्या कळवा (Kalva) येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) उपचारार्थ दाखल केले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. (Fire at Cafeteria of Cinema Star Movie Theater in Thane)

कापूरबावडी येथील हाय स्ट्रीट मॉलमध्ये आग लागली असून तेथे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी, जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप-आयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी तसेच कापूरबावडी पोलिसांनी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र धूर मोठ्या प्रमाणात झाल्याने धुराचा अडथळा येत होता.

प्रयत्न सुरू असताना, पसरलेल्या धुरामुळे गुदमरल्याने श्वास घेण्यास फायरमन दीपक बोराडे, सुनील बोराडे, आणि विनोद पाटील या तिघांना त्रास झाला. याचदरम्यान फायरमन जे पी वाघ यांच्या हाताला काच लागून ते जखमी झाली. त्या चौघांना तातडीने उपचारार्थ ठामपाच्या कळवा येथील रुग्णालयात दाखल केले.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे २- रेस्क्यू वाहन, १- जम्बो वॉटर टँकर आणि २ फायर वाहनाच्या साहायाने ५ तासांच्या शर्थींच प्रयत्न केल्यानंतर ती आग आटोक्यात आली. तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या फायरमन यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा – शिवसेनेतून घाण निघून गेली, आता जे काय व्हायचे ते चांगले होणार – आदित्य ठाकरे