घरठाणेठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग

Subscribe

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या बायोसेन्स डायग्नॉस्टिक कंपनीला आग लागली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा आगीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. नाशिक महापालिकेतील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या कार्यालयाला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. त्यापाठोपाठ आता ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या बायोसेन्स डायग्नॉस्टिक कंपनीला आग लागली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत.

बायोसेन्स डायग्नॉस्टिक कंपनीला आग

ठाण्यातील वागळे परिसराच इंडट्रीयल इस्टेट रोड नंबर ३१ येथील बायोसेन्स ए तुलिप डायग्नोस्टिक कंपनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीने काही क्षणात रोद्र रूप धारण केले आहे. आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून घटनास्थळी दोन फायर इंजिन, दोन वॉटर टँकर आणि रेस्क्यू गाडी पाचारण करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिक महापालिकेतील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचा कार्यालयाला आग!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -