घरठाणेkalyan Burning Car: कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनने घेतला पेट

kalyan Burning Car: कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनने घेतला पेट

Subscribe

पोलीस व्हॅनला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

कल्याण शीळ रोडवर (Kalyan Sheel Road)  पोलीस व्हॅनला भीषण आग लागली आहे. ही व्हॅन मुंबई रेल्वे पोलिसांची असल्याची माहिती समोर येत आहे. कटई नाक्याजवळ या पोलीस व्हॅनने पेट घेतला असून आगीत गाडी जळून खाक झाली असून यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कटाई नाका जवळ, कल्याण येथे कल्याण-शीळ रोडवरती MH 05 C 118 या रेल्वे पोलीस व्हॅनला आग लागली. वाहतुक पोलीस कर्मचारी व कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग सात वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविली आहे. पोलीस व्हॅनने आचानक भर रस्त्यात पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. आग लागल्याने कल्याण शीळ रोडवर बराच मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलीस व्हॅनला लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनला लागलेल्या आगीचे व्हिडिओ समोर आले असून व्हॅनने फार भयानक रित्या पेट घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओतून आगीची भीषणता समोर येत आहे. पोलीस व्हॅनने पेट घेतल्यानंतर आगीचे लोट आजूबाजूच्या परिसरात पहायला मिळत होते. आजूबाजूच्या नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक पोलीस व्हॅनला आग कशी लागली याच तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – नको कोट्यवधींची व्हुईंग गॅलरी, त्यापेक्षा आहे ती चौपाटी सुधारा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -