घरताज्या घडामोडीsankashti chaturthi: वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजन करताना लक्षात ठेवा 'या'...

sankashti chaturthi: वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजन करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी

Subscribe

भारतात सध्या मराठी दिनदर्शिका आणि पंचागानुसार पौष महिना सुरू असून आज पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा आणि उपासना केली जाते.

भारतीय संस्कृतीत गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे. त्यातही दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. माघात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीही महत्त्वाची मानली जाते. माघातील चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. आज पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. त्याचप्रमाणे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असल्याने आजचा दिवस गणेश भक्तांसाठी खास आहे. उत्तर भारताच्या पंचागांनुसार सध्या माघ महिना सुरू असून या दिवसाला उत्तर भारतात सकट चौथ असे म्हणतात. तर भारतात सध्या मराठी दिनदर्शिका आणि पंचागानुसार पौष महिना सुरू असून आज पौष कृष्ण संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा आणि उपासना केली जाते. वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी करताना या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

माघ महिन्यातील चतुर्थीला सकट चौथ, तिळकूट चौथ, तिळ चौथ, वक्रतुंड चौथ, माघी चतुर्थी अशा अनेक नावाने ओळखले जाते. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो. सकाळी लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात. गणेशासाठी खास मोदकांचा नैवेद्य तयार केला जातो. रात्री चंद्रदयोला चंद्राची पूज केली जाते. त्यानंतर गणेशाची पूजा करुन त्याला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेश मंत्राचा जप करुन उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा करताना त्याला 21 दुर्वांचा हार किंवा 21 दुर्वा वाहिल्या जातात. गणेशाला जास्वंद आवडत असल्याने या दिवशी जास्वंद अर्पण केले जाते. ऊस, रताळे, तिळगूळ, तुपाचे लाडू देखील गणेशाला नैवेद्यात दाखवले जातात.

- Advertisement -

गणेशाची पूजा करताना महत्त्वाच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

  • गणेशपूजेत कधीच तुळशीचा वापर केला जात नाही. गणेशाची पूजा करताना तुळशीची मंजिरी किंवा पाने अर्पण करू नका.
  • चतुर्थीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य म्हणजे पाणी अर्पण केले जाते. तेव्हा ते पाणी पायावर पडणार याकडे लक्षात ठेवा.
  • गणेशाची पूजा करताना महिलांनी शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घाला.
  • गणेश चतुर्थीला किंवा गणपतीचा वार असलेल्या मंगळवारी त्याचे वाहन उंदराला त्रास देऊ नका.
  • गणेश चतुर्थीचा उपवास सोडताना काहीतरी गोड खाऊन उपवास सोडावा.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2022: कधी आहे माघी गणेश चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -