घरताज्या घडामोडीमहाडच्या पूरग्रस्तांसाठी उरणच्या शिवसेनेतर्फे पाच लाखांची नवी वस्त्रे

महाडच्या पूरग्रस्तांसाठी उरणच्या शिवसेनेतर्फे पाच लाखांची नवी वस्त्रे

Subscribe

पूरग्रस्तांचा स्वाभीमान जपा

रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाढत असताना यातील अनेकांनी पाठवलेली मदत ही जुन्या आणि वापरता येणार नाही, अशा वस्त्रांची असल्याने पूरग्रस्तांना ती आता नकोशी झाली असल्याचे लक्षात घेत शिवसेनेच्या उरणमधील कार्यकर्त्यांनी सुमारे पाच हजार रुपयांचे नवे कोरे कपडे पूरग्रस्तांना नुकतेच रवाना केले. शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख, माजीआमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही मदत करण्यात आली. पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार्‍या मदतीत जुन्या वस्त्रांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे. महाड आणि पोलादपूर येथील पूरग्रस्त हे मध्यमवर्गीय आहेत. टाकाऊ आणि जुनी वस्त्र परिधान करणे त्यांना अशक्य होऊ लागले आहे. निकामी झालेल्या वस्त्रांची पाकिटे बनवत अनेक संस्था आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जणू पूरग्रस्तांवर उपकारच केले, असा अविर्भाव या वाटपात होता. पूरग्रस्तांना जुनी वस्त्रे पाठवण्याच्या संस्था आणि राजकीय नेत्यांवर टीकाही होऊ लागली आहे. महत्वाचे म्हणजे हे कपडे आता रस्तोरस्ती पडलेले पहायला मिळत आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेच्या उरण शाखेने पाच लाख रुपयांची नवी वस्त्रे महाड आणि पोलादपूरला शनिवारी रवाना केली. यात ३०० नव्या साड्या, ३०० गाऊन्स, ३०० टी शर्ट्स, ३०० बारमोडा, तितक्याच बनियान आणिआवश्यक असलेली वस्त्रे नव्याने खरेदी करत पूरग्रस्तांसाठी पाठवून देण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष मनोहरशेठ भोईर यांचा मोठा वाटा आहे. यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

पूरग्रस्तांचा स्वाभीमान जपा

पूरग्रस्तांवर आपण उपकार करतो, अशा पध्दतीने त्यांच्यावर जुन्या वस्तूंचा आणि कपड्यांचा मारा करणे योग्य नाही. कोकणातील नागरिक हे स्वाभीमानी आहेत. त्यांच्या दु:खावर फूंकर घालायची असेल तर त्यांना नव्या वस्तूंचा पुरवठा केला पाहिजे, हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही नव्याने खरेदी केलेली वस्त्रे त्यांच्यासाठी रवाना केली.
-मनोहर भोईर(शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख)


हेही वाचा – Nasal Spray Covid Vaccine: कॅनडाची सॅनोटाइज कंपनी भारतासह १२ देशांना करणार ‘नेझल स्प्रे’ लसींचा पुरवठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -