घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटLockdown- रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांची 'त्याने' गोळी झाडून केली हत्या!

Lockdown- रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांची ‘त्याने’ गोळी झाडून केली हत्या!

Subscribe

घरातच थांबण्याचे आदेश सरकारने दिले असताना रस्त्यावर फिरत होते, माझा लहान मुलगा एन्टन झोपेतून सारखा उठत होता अशी कारणं सुरूवातीला आरोपीने पोलिसांना दिली.

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतासह अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन असतानाही घराबाहेर गोंधळ करणाऱ्या पाचजमांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घराबाहेर आरडोओरडा केला म्हणून आरोपीने या पाचजाणांना गोळ्या घातल्या आहेत. ही घटना घडलीये रशियामध्ये.

गोळीबार करणारा आरोपी स्वत: एका रुग्णालयात काम करत असून त्याची पत्नी डॉक्टर आहे. आरोपी एन्टन फ्रांचिकोव (३१) याने आपल्या बाल्कनीतून गोंधळ करणाऱ्या लोकांना दम दिला. त्यानंतरही हा गोंधळ, आवाज सुरू असल्यामुळे त्याने शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रायफलने पाच जणांची गोळी मारून हत्या केली. आरोपीने तीनजणांची बाल्कनीतून गोळ्या झाडून हत्या केली. अन्य दोघेजण त्याच इमारतीत लपून बसले होते. त्यांनाही गोळ्या झाडून त्याने ठार मारले. मृतांमध्ये एएका महिलेचाही समावेश आहे. ही महिला गरोदर होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

घरातच थांबण्याचे आदेश सरकारने दिले असताना रस्त्यावर फिरत होते, माझा लहान मुलगा एन्टन झोपेतून सारखा उठत होता अशी कारणं सुरूवातीला आरोपीने पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी याचा इन्कार केला. शेजाऱ्यांमधील भांडणे विकोपाला गेली असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी फ्रांचिकोवने गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -