घरताज्या घडामोडीराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी मुरूडच्या प्रसाद चौलकर यांची निवड

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी मुरूडच्या प्रसाद चौलकर यांची निवड

Subscribe

खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण नवागतांना देत पूर्ण वेळ उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याचा निर्णय घेतला होता.

सलग ३ वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणारे कराटेपटू प्रसाद चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव उंचाविण्यासाठी सज्ज झाले आहेत.२६ ते २९ ऑगस्ट दरम्यान गोवा येथे होणार्‍या वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देशभरातून निवडक खेळाडू सहभागी होणार आहेत. कराटे खेळामध्ये विविध राष्ट्रीय, तसेच आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर चौलकर यांनी स्वतः स्पर्धेत सहभागी होणे थांबवले होते. या खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण नवागतांना देत पूर्ण वेळ उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु मधल्या काळात किकबॉक्सिंग या खेळात देखील नैपुण्य मिळवण्याची इच्छा झाली आणि सराव करण्यास सुरुवात केली. येणार्‍या काळात या खेळात देखील स्वतःची छाप उमटविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपण सगळे आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो, मलाही विद्यार्थी म्हणून जगायला आवडते, असे चौलकर सांगतात. नेहमी शिकत राहणे, काहीतरी चांगले आणि नाविन्यपूर्ण करणे, जेणेकरून स्वतःसोबत आपल्या कुटुंबियांचे, आपल्या गावाचे आणि देशाचे नाव मोठे होईल यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, चौलकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वाको इंडिया किकबॉक्सिंगचे महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश शेलार, नवी मुंबईचे पदाधिकारी आशिष राणे यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले. पुढील वाटचालीत ते मोठे यश संपादन करतील, असा विश्वास प्रशिक्षक सेन्सेई अरुण बोडके यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – शिवसेना अजून बाल्यावस्थेत; राणेंची पुन्हा एकदा जहरी टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -